TMC मधील बंडखोरीदरम्यान पश्चिम बंगालच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर कोलकातामध्ये पोहचले अमित शाह

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी रात्री राज्याच्या दोन दिवसीय दौर्‍यावर कोलकाता येथे पोहचले आहेत. त्यांचा हा दौरा अशावेळी होत आहे, जेव्हा सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये बंडखोरी सुरू आहे.

अंदाज वर्तवला जात आहे की, तृणमूल काँग्रेस आणि राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्रीपद सोडणारे नेते सुवेंदु अधिकारी, शीलभद्र दत्ता आणि जितेंद्र तिवारी यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे काही नेते, शाह यांच्या बंगाल दौर्‍यादरम्यान भाजपात प्रवेश करतील. भाजपाचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी अनिल बलूनी यांनी जारी केलेल्या वक्तव्यानुसार, शाह शनिवार, रविवारी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.

भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, शाह कोलकाता येथे पोहचल्यानंतर न्यूटाऊनच्या हॉटेलमध्ये थांबणार आहेत. शनिवारी सकाळी शाह हे एनआयएच्या अधिकार्‍यांची बैठक घेतील. यानंतर ते उत्तर कोलकातामधील स्वामी विवेकानंद यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करतील. यानंतर शाह मिदनापुरला जातील आणि क्रांतिकारी खुदीराम बोस यांना श्रद्धांजली अर्पण करतील आणि दोन मंदिरांमध्ये पूजा करतील.

मिदनापुरमध्ये सभेला संबोधित करतील अमित शाह
भाजपा नेत्याने सांगितले की, गृहमंत्री एका शेतकर्‍याच्या घरी दुपारी जेवण करतील. नंतर मिदनापुरच्या कॉलेज मैदानात आयोजित सभेला संबोधित करतील. भाजपा नेत्याने म्हटले, अशी शक्यता आहे की, तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते रॅलीच्या दरम्यान, भाजपामध्ये प्रवेश करतील. या रॅलीनंतर शाह कोलकाता येथे परततील आणि येथे राज्यातील नेत्यांसोबत बैठक घेतील आणि संघटनेचा आढावा घेतील.