बंगालमध्ये भाजपच्या 130 कार्यकर्त्यांच्या बलिदानाचा होईल विजय; 200 जागा आणून स्थापन करणार सरकार- अमित शहा

नवी दिल्ली: वृत्तसंस्था- यावेळी पश्चिम बंगाल विधानसभेच्या २०० हुन अधिक जागा जिंकून भाजप सरकार स्थापन करेल असा दावा गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. बंगालमधील लोकांवर ज्या प्रकारे अन्याय झाला आहे, त्याचे उत्तर मिळेल, असेही ते म्हणाले. न्यूज १८ सोबत बोलताना ते म्हणाले की , त्यांनी यापूर्वी बंगालमध्ये पंतप्रधान मोदींसारखा नेता कधीही पाहिला नव्हता. बंगालमध्ये आतापर्यंत पाच टप्प्यांत निवडणुका घेण्यात आल्या आहेत. मतदानाच्या तीन फेऱ्या अजूनही बाकी आहेत.

एका हिंदी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अमित शहा म्हणाले की, ”आज मला फार आनंद झाला आहे की माझा पक्ष मजबूत आहे. मोदीजींच्या नेतृत्वात संपूर्ण बंगाल बदलासाठी तयार आहे आणि येथे बदलही होतील. २०१७ ते २०२१ च्या प्रवासात, २०१९ चा पाडाव येतो. मला वाटते की आमच्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले आहे. ज्या मार्गाने बंगालमधील लोकांवर दडपशाही झाली, त्यांच्यावर अन्याय झाला, ज्या वर्गांच्या मनात अशी भावना निर्माण झाली की आपण दुसऱ्या वर्गातील नागरिक आहोत, त्यांना त्यांचे उत्तर मिळाले आहे. मला विश्वास आहे की २०० जागा जिंकून भाजप सरकार स्थापन करणार आहे.

तृष्टीकरणाचे राजकारण
शहा यांच्या म्हणण्यानुसार, ममतांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाने बंगालचे लोक अत्यंत नाराज झाले आहेत. ते म्हणाले, ”येथील मोठा विभाग तुष्टीकरणामुळे नाराज आहे. दुर्गा विसर्जन करायचे असेल तर हाय कोर्टात का जावे लागले? हे सर्व प्रश्न मनामध्ये आहेत. वोट बँकेच्या राजकारणामुळे याकडे दुर्लक्ष केले जात आहे. घुसखोरीमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. तुष्टीकरणामुळे मुख्यमंत्री आमच्या नागरिकत्व कायद्याला विरोध करत आहेत, आन्यायविरुद्ध त्याचे कोणी संरक्षण करू शकत नाही, प्रत्येकाची आशा बीजेपीसोबत बांधलेली आहे.”

सर्वत्र नाराजी
शहा पुढे म्हणाले की २०१६ मधील निवडणूक हरल्यानंतर भाजपने येथे तयारी सुरु केली आहे. ते म्हणाले, ”ध्रुवीकरणाचे राजकारण, घुसखोरी यामुळे जनता संतप्त झाली आहे. हे सर्व बंगालमध्ये होत आहे. येथे जा आणि पहा, रस्ता नाही, लाईट नाही, पिण्याचे पाणी घरामध्ये पोहचत नाही, आरोग्य नाही.”

बंगालमधील अन्यायाविरुद्ध निषेध करण्यासाठी ”जय श्री राम” घोषणा
निमलष्करी दलांवरील सतत ममतांनी केलेल्या आरोपावर अमित शहा म्हणाले, निवडणुकीत ते केंद्र सरकारच्या आधीन राहून काम करीत नाहीत हे त्यांना कळले पाहिजे. त्याऐवजी हे सर्व निवडणूक आयोगांतर्गत काम करतात. जय श्री राम घोषणेच्या प्रश्नावर अमित शहा म्हणाले, ”जय श्री राम घोषणा बंगालमधील आन्यायविरुद्ध आवाज उठविण्यासाठी नारा आहे, हे मला मान्य आहे. तुम्ही हा धर्माचा नारा मानू नका, ही घोषणा लोकांनी तयार केली आहे, ती भाजपची घोषणा नाही.”

१३० कार्यकर्त्यांचे बलिदान
अमित शहा पुढे म्हणाले, येथे विजय मिळवणे हा त्यांचा वयक्तिक विजय ठरणार नाही. ते म्हणाले, ”मी एक भाजप कार्यकर्ता आहे, भाजपाची विचारधारा देशाच्या इंच इंच भागापर्यंत घेऊन जाणे, हाच बीजेपीचा विजय असेल, १३० कार्यकर्त्यांच्या बलिदानाचा विजय असेल”. बंगालच्या निवडणुकीचा निकाल २ मे रोजी येईल.