प. बंगलामधील राजकरणाला धार्मिक वळण; रोडवर वाचली हनुमान चालीसा

पश्चिम बंगाल : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेतील विजयानंतर भाजपची अधिकच पावरमध्ये आले आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांची मनमाई सुरु झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय वादाला आता धार्मिकतेचा रंग चढताना दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यांनी एक सवाल उपस्थित केला आहे. मुस्लिम लोक शुक्रवारी रोडवर नमाज करतात. मग आम्ही मंगळवारी रोडवर हनुमान चालिसा म्हटलं तर काय हरकत आहे, असा सवाल केला आहे.

मंगळवारी हावडा बाली येथे भाजप युवा अध्यक्ष ओम प्रकाश आणि प्रियंका शर्मा यांच्या नेतृत्वाखाली शेकडो लोक जमा झाले होते. या सर्वांनी एकत्र येत रोडवरच हनुमान चालिसा म्हटली. त्यामुळे काही तासांसाठी हा मार्ग बंद करण्य़ात आला होता.

ओमप्रकाश यांनी यावर आपले मत व्यक्त केले. एका धर्माचे लोक शुक्रवारी रोडवर नमाज पठन करू शकतात, तर आम्ही हनुमान चालिसा का नाही वाचू शकत, असा सवाल करत त्यांनी यावेळी एक निर्णयही सांगितला. यापुढे प्रत्येक मंगळवारी हावडाला वेगवेगळ्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचली जाईल, असा निर्णय त्यांनी घेतला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपासून भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय मतभेद वाढले होते. मात्र निकालानंतर हे तणाव अधिक वाढत चालले आहेत, तसंच यांना धार्मिकतेचे वळण लागले आहे. नुकतीच बांकुरा जिल्ह्यातील पोलिसांच्या गोळीबारात एक शाळेतील विद्यार्थी आणि दोन भाजपा कार्यकर्ते जखमी झाले. टीएमसी खासदार सुवेंदु हे बंकुरा येथे झालेल्या सार्वजनिक बैठकीत आले होते.

येथे, भाजप कार्यकर्त्यांनी जय श्रीरामांच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर तृणमुल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तवाण वाढले. यावेळी भाजपचे दोन कार्यकर्ते आणि एक विद्यार्थी जखमी झाले होते. त्यानंतर जय श्री रामच्या घोषणा दिल्यानंतर पोलिसांनी गोळीबार केल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे आता पश्चिम बंगालमधील राजकारणाला धर्मिक रंग चढताना दिसत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त

जाणून घ्या ‘लिंबाचे’ औषधी गुणधर्म

या’ गोष्टी फॉलो करा आणि निकालाचे नैराश्य घालवा

‘केस’ धुताना घ्या ही काळजी

मधुमेहामुळे पाय गमावण्याची वेळ येऊ नये यासाठी ‘ही’ काळजी अवश्य घ्या