तांब्याचं ‘ब्रेसलेट’ किंवा ‘अंगठी’ वापरण्याचे शरीराला होतात ‘हे’ 8 मोठे फायदे ! एकाच आठवड्यात दिसतो फरक

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनेकजण तांब्याची अंगठी किंवा ब्रेसलेट घालतता. तांब्यात अँटी बॅक्टेरियल आणि अँटी मायक्रो बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळं अनेक आजारांपासून बचाव होतो. मॉडर्न सायन्सनंही हे मान्य केलं आहे की, तांब्याचा शरीराला स्पर्श झाला तर अनेक आजार दूर होतात. आज आपण याचे विविध फायदे जाणून घेणार आहोत.

1) रोगप्रतिकारक शक्ती वाढते – तांबं शारीरिक संतुलनात मदत करतं. यामुळं शरीर मजबूत होतं. यामुळं रक्त शुद्ध होतं आणि हिमोग्लोबिन वाढतं. रक्ताभिसरण चांगलं होतं. इतकंच नाही तर विषारी धातूंच्या प्रभावापासूनही शरीराचा बचाव होतो.

2) निरोगी हृदय – कॉपर ब्रेसलेटमुळं हृदय सुद्धा निरोगी राहतं जेणेकरून हार्ट अटॅक सारख्या समस्याही रोखल्या जाऊ शकतात.

3) ब्ल्ड प्रेशर कंट्रोल – तांब्याची अंगठी किंवा ब्रेसलेट वापरलं तर ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो.

4) हृदयाचं आरोग्य सुधारतं – शरीरात कोलेजन, इलास्टिन आणि फायबर यांना क्रॉसलिंग करण्यासाठी कॉपरची खूप मदत होते. जेव्हा तांब्याची कमतरता निर्माण होते तेव्हा धमण्या कमजोर होण्याची शक्यता असते. एका रिसर्चमधून असं समोर आलं आहे की, तांब्याच्या कमतरतेमुळं शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं.

5) हाडे मजबूत होतात – ज्यांना हाडांच्या समस्या आहेत त्यांनी तांब्याचं ब्रेसलेट नक्की वापरावं. यानं सांधेदुखी दूर होते आणि हाडे मजबूत होतात.

6) चमकदार त्वचा – तांब्यात असणारे अँटी ऑक्सिडंट गुण फ्री रॅडिकल्सना शरीरात विषारी पदार्थ पसरवण्यापासून रोखतात. त्वचा निरोगी राहून त्वचेचे सामान्य रोग यानं दूर होतात. तांब्याची अंगठी जर वापरली तर हात, बोटे आणि पायांवरील सूजही कमी होते.

7) पोटाची समस्या – तांब्यानं पोटाच्या सम्सयाही दूर होतात. अॅसिडिटीची समस्या असेल तर तांब्याची अंगठी किंवा ब्रेसलेट वापरलं तर फायदा होईल.