महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीचे केंद्र सरकारने सांगितलं कारण; वाचा काय आहे ते…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या थोड्या प्रमाणात कमी होती. मात्र, आता ही संख्या वाढत आहे. महाराष्ट्रासह पाच राज्यांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. पुणे, मुंबईसह आता विदर्भातही कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. त्यावर आता केंद्र सरकारने रुग्णवाढीमागचे कारण दिले आहे.

महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. या दोन राज्यांत 75 टक्के कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी केरळमध्ये 37.85 टक्के तर महाराष्ट्रात 36.87 टक्के केसेस आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. याबाबत इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR)महासंचालक डॉ. बलराम भार्गवा म्हणाले, की महाराष्ट्र आणि केरळमध्ये N440K आणि E484K कोरोना आहे. पण राज्यातील उद्रेकाशी या नव्या व्हेरियंटचा संबंध जोडता येऊ शकत नाही. कारण या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे अद्याप पुरावे मिळाले नाहीत.

केंद्राचे पथक पाठवलं
कोरोना व्हायरसचा उद्रेक कशामुळे झाला, याची माहिती घेतली जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने पथक पाठवले आहे. या पथकाने अभ्यास केल्यानंतर उद्रेकाचे नेमकं कारण काय आहे हे समजेल. या कारणानंतरच कोरोनावर नियंत्रण मिळवायचे कसे याची योजना आखली जाईल, असेही सांगण्यात आले.