ट्रकमालकाने ‘विक्रमी’ 2 लाख 500 रुपयांचा दंड भरला ’कोर्टात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन मोटार वाहन कायद्यातील सुधारणांमधील दंडाच्या प्रचंड रक्कमेमुळे जनतेत नाराजी आहे. हा दंड कमी करण्याचा विचार सुरु असताना दिल्ली पोलिसांनी एका ट्रकचालकाला तब्बल २ लाख ५०० रुपये दंड केला आहे.

हरियानामधील हा ट्रक दिल्लीतील मुकारबा चौकात आला. वाहतूक पोलिसांनी या ओव्हरलोड ट्रकला थांबवून तपासणी केली. त्यात या ट्रकचालकाकडे लायसेंस नव्हते, आर सी बुक नव्हते, ना फिटनेस, ना परमिट आणि विमाही उतरविण्यात आलेला नव्हता. त्याशिवाय ट्रक ओव्हरलोड होता. जवळपास वाहतूकीच्या सर्व नियमांचा भंग या ट्रकने व ट्रकचालकाने केला होता. वाहतूक पोलिसांनी त्यावर २ लाख ५०० रुपये दंडाची आकारणी केली. ट्रकमालकाला हे समजताच तो दिल्लीत आला. त्याने नवी दिल्लीतील रोहिणी कोर्टात २ लाख ५०० रुपये जमा केले.

पैसे जमा केल्यानंतर ट्रकमालकाने इतका दंड का करण्यात आला याची काहीही माहिती नसल्याचे सांगितले. हरियाणामध्येही लवकरच विधानसभा निवडणुका असून नवीन मोटार वाहन कायद्याची जोरदार अंमलबजावणी हरियाणात सुरु आहे. त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनीही या भरमसाट दंडामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरत असल्याचे सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –