देशात 45 कोटी हून अधिक इंटरनेट युजर्स, मुंबईत सर्वाधिक वापर तर देशाचा जगात दुसरा नंबर, जाणून घ्या 5 फॅक्ट्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- देशातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वेगाने वाढत आहे. IAMAI (इंटरनेट अँड मोबाइल एसोसिएशन ऑफ इंडिया) च्या अहवालानुसार भारतात ४५ कोटीहून अधिक इंटरनेट वापरकर्ते आहेत. भारताची १३० कोटींच्या जवळपास असणारी लोकसंख्या लक्षात घेता ही संख्या जवळपास ३५ टक्के इतकी आहे. खेड्यात आणि शहरात इंटरनेटचे नेटवर्क कसे पसरते आहे ते जाणून घेऊयात आकडेवारीच्या साहाय्याने-

१. देशात सध्या ४५.१ कोटी लोक इंटरनेट वापरणारे आहेत. नवीन इंटरनेट वापरकर्ते देशात ३६% दराने वाढत आहेत. ग्रामीण भागात हा दर लक्षणीय आहे.

२. मोठ्या शहरांपैकी महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणार मुंबई इंटरनेट वापरकर्त्यांच्या बाबतीत अव्वल आहे. येथे सर्वाधिक वापरकर्ते असून १.१७ कोटी लोक इंटरनेट वापरतात. तर देशाची राजधानी दिल्ली येथे ही संख्या १.१२ कोटी आहे.

३. भारतात इंटरनेट वापरणाऱ्या ३ जणांपैकी पैकी प्रत्येकी २ जण १२ ते २९ वर्षांच्या दरम्यान वयोगटातील आहेत. शहरातील एकूण इंटरनेट वापरकर्त्यांपैकी ६२% पुरुष असून ग्रामीण भागामध्ये ७२% पुरुष वापरकर्ते आहेत.

४. गावांत इंटरनेट दररोज इंटरनेट वापरणाऱ्या व्यक्तींची संख्या ५७% आहे तर शहरात दररोज इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची संख्या ७२% इतकी आहे.

५. महिना ४५.१ अ‍ॅक्टिव्ह इंटरनेट युजर्स इतकी संख्या असल्याने भारत जगभरात दुसरा सर्वाधिक इंटरनेट वापरकर्ते असणारा देश ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर चीन आहे.

visit : Policenama.com