गर्भधारणेची योग्य वेळ कोणती ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञांच्या मते, महिलांसोबतच पुरुषांसाठीही ही गोष्ट महत्त्वाची आहे की, गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्याआधी दोघांनी आपलं शारीरिक परीक्षण करणं गरजेचं आहे. यामुळे गर्भाशयासंबदर्भातील अनेक समस्यांचे निदान करणे सोपे जाईल.

जर तुमचे पीरियड्स 5 ते 7 दिवस चालत असतील आणि यानंतर तुम्ही लगेचच सेक्स करत असाल तर तुम्ही प्रेग्नंट राहण्याची शक्यता जास्त असते. जर तुमचा रक्तस्त्राव पीरियड्सच्या 6 व्या दिवशी बंद होत असेल तर 7 व्या दिवशी सेक्स करणे गरजेचे असते.

तु्म्ही 11 व्या दिवशी पुन्हा प्रयत्न करू शकता. कारण यावेळी अंडोत्सर्गाची प्रक्रिया सुरु झालेली असते. तज्ञांनुसार, असे पाहण्यात आले आहे की, गर्भधारणेसाठी शुक्राणू 6व्या दिवशीच फॅलोपियन ट्युबमध्ये वाट पहात असतात. साधारणपणे अंडोत्सर्गाच्या दिवशी (मासिक पाळीच्या 12 ते 14 दिवस आधी) आणि त्यानंतर 5 दिवसांपर्यंत स्त्रीची प्रजनन क्षमता अधिक असते. सरासरी महिलेसाठी ही 10 व्या ते 17 व्या दिवसादरम्यान असते.

पीरियड्सनंतर गर्भधारणेसाठी महिलेने स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हा महिन्यातील तो काळ असतो जेव्हा असुरक्षित सेक्स करण्यामुळे महिलांना संक्रमणाचा धोका अधिक असतो. जर तुम्हाला गर्भधारणा हवी असेल कर मासिक पाळी पूर्ण होऊ द्या आणि मग त्यासाठी प्रयत्न करा.

दुसरीकडे असेही म्हटले जाते की, फर्टाईल फ्ल्युइडच्या अनुपस्थितीत शुक्राणूंचा जीवनकाळ 2 ते 3 दिवस किंवा त्यापेक्षाही कमी होतो. अधिक प्रमाणात गर्भधारणा ही अंडोत्सर्गाच्या दिवशी किंवा त्याच्या 5 दिवस आधी सेक्स केल्याने होते. जर तुम्हाला प्रेग्नंट व्हायचं असेल तर असा सल्ला दिला जातो की, तुम्ही अंडोत्सर्गाच्या वेळेची वाट पहावी.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like