WhatsApp चं नवं फीचर ! यूजर्सला नवीन मेसेज मिळाल्यानंतर सुद्धा Archived Chats कडून मिळणार नाही नोटिफिकेशन

नवी दिल्ली : WhatsApp आर्काइव्ह चॅट (Archived Chats) नावाचे एक नवीन फीचर आणले आहे, जे यूजर्सला प्लॅटफॉर्मवर येणार्‍या प्रत्येक मेसेजऐजवी आवश्यक मेसेजवर फोकस करण्यात मदत करेल. मेसेजिंग अ‍ॅप आता यूजर्सला (WhatsApp) आपल्या आर्काइव्ह चॅटला नेहमीसाठी म्यूट करेल, याचा अर्थ हा सुद्धा आहे की, आर्काइव्ह चॅट नवीन मेसेज आल्यानंतर सुद्धा चॅट विंडोमध्ये दिसणार नाही.

व्हॉट्सअप यूजर्सच्या आर्काइव्ह चॅटसाठी नवीन सेटिंग्ज रोल आऊट करत आहे जी यूजर्सला त्यांच्या इनबॉक्सवर जास्त कंट्रोल ऑफर करेल आणि आर्काइव्ह चॅट्स फोल्डर ऑर्गनाईज्ड करण्यासाठी अनेक ऑपशन देईल. कंपनीनुसार, अनेक यूजर्स ही मागणी करत होते की, आर्काइव्ह मेसेजला मेन चॅट लिस्टमध्ये बनवण्याऐवजी आर्काइव्ह चॅट फोल्डरमध्ये हाईड केले गेले पाहिजे. हे फीचर iPhone यूजर्ससाठी उपलब्ध करून दिले होते, आता ते अँड्रॉइड यूजर्ससाठी रोल आऊट केले जात आहे.

महत्वाचे म्हणजे कोणतेही चॅट आर्काइव्ह केल्याने डिलिट होत नाही किंवा तुमच्या SD कार्डमध्ये बॅकअप होत नाही. तुम्ही चॅटला कसे Archived करू शकता जाणून घेवूयात…

– चॅट टॅबवर जा, त्या चॅटला टॅप करून ठेवा जे हाईड करायचे आहे.

– हे होल्ड केल्यानंतर archive आयकॉन मिळेल.

– iPhone यूजर्स चॅटला डावीकडे स्लाईड करून archive ऑपशन शोधू शकतात.

– आर्काइव्ह चॅट पाहण्यासाठी Android फोनवर चॅट टॅबमध्ये सर्वात वर जा.

– आर्काइव्ह आयकॉनवर सर्वात वर Archive च्या पुढे एक नंबर सुद्धा मिळेल, जो दाखवेल की किती आर्काइव्ह पर्सनल किंवा ग्रुप चॅटमध्ये unread मेसेज आहेत.

– नवी फीचर प्राप्त करण्यासाठी, फोनवर अ‍ॅपच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपडेट करावे लागेल.

हे देखील वाचा

Pune Crime | ‘ऑनलाईन क्लास’वरुन वाद ! मुलाचा मोबाईल तोडला आणि पत्नीला केली बेदम मारहाण; कोंढव्यातील घटना

IMD Alert | पुढील काही तासात पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ‘या’ 9 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  WhatsApp messaging app will now let users mute their archived chats forever

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update