Whatsapp New Features | ‘व्हॉट्सअप’चं येतंय खास फीचर, एका फोनमध्ये 2 नंबर चालणार, जाणून घ्या आगामी 5 फीचर्स

मुंबई : Whatsapp New Features | सध्या WhatsApp हे सर्वच वयोगटातील लोकांचे आवडते माध्यम झाले आहे. जगभरात कोट्यवधी लोक याचा वापर करतात. मेटा कंपनी नेहमीच नवनवीन फीचर्स (New Features) WhatsApp यूजर्ससाठी आणत असते. आज आपण व्हॉट्सअपच्या ५ विशेष फीचर्सची माहिती घेणार आहोत. यामध्ये एका फोनमध्ये २ नंबर, या फीचर्सबाबत देखील जाणून घेऊया.

स्मार्टफोनमधील दोन्ही सिमवर व्हॉट्सअप चालवायचे असेल तर आधी क्लोन App वापरून हे करता येत होते. आता कंपनी नवीन फीचर देणार असून यामध्ये एकाच App मध्ये दोन व्हॉट्सअप अकाउंट नंबर वापरता येतील. मेटाने ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे.

तसेच आता व्हॉट्सअपमध्ये लवकरच ईमेल व्हेरिफिकेशनचा पर्याय दिला जाईल. याद्वारे युजर्सला फोन नंबरवर मिळालेल्या ओटीपीची गरज भासणार नाही.

तसेच सर्चमध्ये कॅलेंडरचा पर्याय आणि मल्टी अकाऊंट लॉगिनची सुविधाही असेल. WAbetainfo या वेबसाइटने या फीचर्सची माहिती आधीच शेअर केली आहे.

WhatsApp एका नवीन फीचरवर काम करत असून त्याचे नाव ईमेल व्हेरिफिकेशन आहे. हे फीचर व्हॉट्सअप अकाउंट सेटिंगमध्ये ईमेल अ‍ॅड्रेसच्या रूपात असू शकते. मात्र, ते स्टेबल व्हर्जनमध्ये कधी येईल, याबाबत स्पष्टता नाही.

व्हॉट्सअपवर एक नवीन सर्च फीचर येणार असून ते सर्चमध्ये कॅलेंडरच्या स्वरूपात दिसेल.
याद्वारे युजर्स जुन्या फाईल्स सहजपणे शोधतील. याद्वारे तारखेवरून एखादी गोष्ट शोधता येईल.
हे फीचर बीटा आवृत्ती V2.2348.50 मध्ये स्पॉट झाले आहे.

व्हॉट्सअपमध्ये प्रायव्हसीबाबतचे Alternate Profile Privacy Feature येत आहे.
ज्याच्याकडे तुमचा नंबर सेव्ह नाही अशा व्यक्तीशी पर्यायी प्रोफाइल शेअर करता येईल.
पर्यायी प्रोफाइलमध्ये नाव, फोटो आणि इतर तपशील बदलले जाऊ शकतात.

व्हॉट्सअपच्या एका नवीन फीचरद्वारे युजर्स त्यांचे व्हिडीओ, फोटो आणि डॉक्यूमेंटंस ओरिजनल क्वालिटीमध्ये पाठवू शकतील.
ही माहिती WAbetainfo ने सुद्धा शेअर केली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bipasha Basu Instagram Photo | बिपाशा बासूने शेअर केला ऑपरेशन थिएटरमधला फोटो…