WhatsApp च्या नव्या Privacy Policy ची चिंता वाटतीये ? तर फॉलो करा ‘या’ सेफ्टी टिप्स्

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियापैकी एक असलेल्या WhatsApp चा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. जगातील बहुतांश लोक या WhatsApp चा वापर करत आहेत. पण कंपनीच्या नव्या पॉलिसीमुळे युजर्समध्ये मोठी नाराजी आहे. अनेक युजर्स आता WhatsApp सोडून Telegram आणि Signal चा वापर करत आहेत.

WhatsApp ने प्रायव्हसी पॉलिसीला ऍक्सेप्ट करण्याची तारीख वाढवली आहे. त्यानुसार, 8 फेब्रुवारीला होणारा बदल आता 15 मे पासून होणार आहे. मात्र, तुमचा डाटा सुरक्षित राहावा, असे वाटत असेल तर WhatsApp मध्येच काही बदल करावा लागणार आहे. WhatsApp मध्ये अशा काही सेंटिग्ज आहेत. त्यामुळे डाटा सुरक्षित राहू शकतो.

Two Step Verification : WhatsApp वरील हे फिचर्स सुरु करणे गरजेचे आहे. या फिचर्सच्या माध्यमातून एक्स्ट्रा सिक्युरिटी मिळते. जर तुम्हाला WhatsApp Reset करायचं असेल तर तुमच्याकडे 6 अंकी पिन असणे गरजेचे आहे.

Web WhatsApp सुरु करण्यासाठी पासवर्ड : जर Web WhatsApp सुरु करण्यासाठीही सिक्युरिटी कोड टाकता येऊ शकतो. तसेच Web WhatsApp सुरु करण्यासाठी QR Code ची गरज लागते. पण आता हाच QR Code पासवर्ड टाकून सुरक्षित करता येऊ शकतो.

WhatsApp Lock : WhatsApp च्या फिचर्सच्या माध्यमातून WhatsApp मध्ये लॉक लावता येऊ शकते. हे फिचर्स ऍक्टिव्हेट करण्यासाठी फिंगरप्रिंट द्यावे लागेल. त्यानंतर WhatsApp Access करता येऊ शकेल.