म्यूट व्हिडिओपासून लॉगआउट फीचरपर्यंत Whatsapp चे अपकमिंग 4 फीचर्स, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  व्हॉट्सअ‍ॅप अनेक खास फिचर्स आणत असते. मागील वर्षी व्हॉट्सअ‍ॅपने अनेक उपयोगी फिचर्स आपल्या युजर्ससाठी आणले होते. आता आणखी काही नवीन फिचर्स आणणार आहे. यासाठी कंपनीकडून तयारी पूर्ण करण्यात येत आहे. येणाऱ्या नव्या फिचर्समध्ये युजर्सना मल्टी डिव्हाईस सपोर्ट पासून रिड लेटल सारख्या फीचर्सचा समावेश आहे. जाणून घ्या नव्या फिचर्सबाबत…

व्हॉट्सअ‍ॅप म्युट व्हिडीओ

जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर खूप व्हिडीओ सेंड करत असाल तर हे फिचर तुमच्यासाठी उपयुक्त आहे. या फिचरद्वारे व्हॉट्सअ‍ॅप युजर कोणत्याही कॉन्टॅक्टला व्हिडीओ पाठवण्याआधी म्यूट करु शकतो. म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप युजर्स कडून पाठवलेल्या व्हिडीओचा आवाज बंद करु शकतो. सध्या या फिचरची टेस्टिंग केली जात असून या फिचरला सर्व युजरसाठी लवकरच रोल आउट करु शकतो.

व्हॉट्सअ‍ॅप रीड लेटर फीचर

व्हॉट्सअ‍ॅपचे रीड लेट फीचर अ‍ॅपमध्ये आधीच आर्काइव्ह चॅट्सचे नवे रुप असणार आहे. याद्वारे युजर्स कोणत्याही चॅट्सला जोपर्यंत हवे असेल तोपर्यंत आर्काइव्ह ठेऊ शकता. यानंतर चॅटमध्ये कोणत्याही मेसेजचे नोटिफिकेशन युजर्सला मिळणार नाही. म्हणजे युजर्स पूर्णपणे चॅट लपवू शकतो किंवा त्याकडे दुर्लक्ष करु शकतो.

मल्टी डिव्हाइस सपोर्ट फिचर

या फीचरसंबंधी लागोपाठ माहिती समोर येत आहे. एका रिपोर्टनुसार, या फिचरची टेस्टिंग बीटा व्हर्जन केली जात आहे. तसेच याला लवकरच रोल आउट केले जाऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅप मल्टी डिव्हाइस सपोर्ट फीचरद्वारे युजर्स एक व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटला एकाचवेळी चार डिव्हाइसपर्यंत चालवू शकतो. सध्या एका अकाऊंटला एकाच डिव्हाइसवर चालवले जाऊ शकते.

लॉग आउट फिचर

हे फिचर नुकतेच दिसले होते. यात मल्टी डिव्हाइस फीचरचा काही भाग असल्याचे सांगण्यात आले. एका अहवालानुसार, यात युजर्स मल्टीपल डिव्हाइस ने आपले अकाऊंट लॉग आउट करु शकतो. हे फीचर सध्या टेस्टिंग फेजमध्ये आहे. रिपोर्टनुसार, हे व्हॉट्सअॅप बीटासाठी 2.21.30.16 अपडेटमध्ये दिसले आहे.