WhatsApp | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये होणार मोठा बदल, लवकरच येणार ‘हे’ नवं फिचर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  लवकरच व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) ग्रुप्सना रामराम ठोकावा लागू शकतो. व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) एका नवीन फिचरवर काम करत आहे जे व्हॉट्सअ‍ॅपच्या ग्रुपफीचरशी (WhatsApp’s group feature) संबंधित आहे. व्हॉट्सअ‍ॅप गुप फिचरला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. म्हणूनच कंपनी व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिटी (WhatsApp community) नावाचे फीचर आणण्यासाठी त्यात बदल करण्याची योजना आखत आहे. या फीचरमध्ये आणखी काही सेवा अॅड-ऑन असतील. हे देखील शक्य आहे की व्हॉट्सअ‍ॅप आपल्या ग्रुप्स फीचरचे नाव कम्युनिटी असे करु शकते.

व्हॉट्सअ‍ॅप  सध्या एका नवीन फिचरवर काम करत असल्याची माहिती APK ‘टियरडाउन’ मधून समोर आली आहे.
या फिचरचे नाव कम्युनिटी असेल आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्ससह हे फिचर देखील वापता येऊ शकते.
नवीन कम्युनिटी फिचरची माहिती टेक वेबसाईट XDA Developers ने दिली आहे.
वेबसाईटने WhatsApp च्या बीटा व्हर्जन 2.21.21.6 च्या एपिके फाईलचे टियरडाऊन करुन ही माहिती मिळवली आहे.

ग्रुप्स व्यतिरिक्त या कम्युनिटी फिचरच्या माध्यमातून सोशल मीडियाचा (social media) अंश देण्याचा प्रयत्न कंपनी करु शकते, अशी माहिती रिपोर्टमधून मिळाली आहे.
किंवा या फिचरच्या माध्यमातून युजर्स ग्रुप चॅट (Group chat) संघटित करु शकतील.
सध्यातरी या फिचरची अचूक माहिती समोर आलेली नसली तरी लवकरच या फिचर बाबत सविस्तर माहिती समोर येऊ शकते.

 

Voice Notes Feature

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फीचर्सवर लक्ष ठेऊन असणाऱ्या WABetaInfo या वेबसाईटने या फिचरची माहिती दिली आहे.
रिपोर्टनुसार हे फिचर iOS आणि Android साठी व्हॉट्सअ‍ॅप Beta च्या आगामी अपडेटमध्ये रोल आउट करण्यात येईल.
या अपडेटनंतर युजर व्हॉईस नोट रेकॉर्ड (Voice note record) करताना रेकॉर्डिंग पॉज थांबवू शकतात आणि त्यात अजून रेकॉर्डिंग जोडू शकतात.
यापूर्वी पॉजचे फिचर नसल्याने छोटे छोटे नोट पाठवले जायचे. आता एकाच व्हॉईस नोटमधून संपूर्ण मुद्दा मांडता येईल.

 

Web Title : Whatsapp | whatsapp community feature may replace whatsapp groups

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Car Buying Guide | नवीन गाडी खरेदी करत आहात का? ‘या’ 5 पॉईंटचा आवश्य विचार करा, अन्यथा घेतल्यानंतर करावा लागेल पश्चाताप!

Pune Crime | गजा मारणेच्या 4 साथीदारांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

OBC Reservation | पंकजा मुंडेकडून फडणवीसांचे ‘कौतुक’ ! म्हणाल्या – ‘ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढली, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं’