OBC Reservation | पंकजा मुंडेकडून फडणवीसांचे ‘कौतुक’ ! म्हणाल्या – ‘ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढली, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावरुन भाजपच्या (BJP) राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कौतुक केले आहे. मोदींनी देशातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजाला 10 टक्के आरक्षण देऊ केलं. तर मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्यावरुन बोलताना फडणवीस यांनीच ते महाराष्ट्राला दिल्याचं पंकजा यांनी सांगितलं. तसेच राज्य सरकारने पोटनिवडणुकांच्या आगोदरच हा अध्यादेश (OBC Reservation) का काढला नाही ? असा सवालही सरकारला विचारला आहे.

मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केलंय

भाजपच्या ओबीसी (OBC Reservation) जागर अभियानांतर्गत औरंगाबादमध्ये ओबीसी मोर्चाकडून मोळाव्याचं आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला दिल्याचे सांगितले. आता एक नवीन षडयंत्र सुरु झालंय.
बहुजनाची व्याख्या खराब करण्याचं हे षडयंत्र आहे. इकडे ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा उचलून धराल तर दुसरीकडे कोणीतरी षडयंत्रकारी लोक मराठा आरक्षणाचा मुद्दा काढतात.
मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे कामही तुम्हीच केलंय.
मराठा समाजाला आरक्षण ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढत होतात, त्याच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलंय, असे पंकजा यांनी सांगितले.

 

महाराष्ट्रात राजकीय भविष्य काय

मराठा समजाला आरक्षण दिलं, त्या मराठा समाजाचं आरक्षण आज संपुष्टात आलं. ओबीसी समाजाचं आरक्षण बचाव करण्याचा आम्ही प्रयत्न केला.
ते आरक्षण आज संपुष्टात आलं. आज महाराष्ट्रात राजकीय भविष्य काय, येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाच्या डोक्यावर टांगती तलवार देण्याचं काम या आघाडी सरकारने केले आहे.
असे म्हणत पंकजा यांनी राज्यातील आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

तर सरकारचं कौतुक करु, पण…

सरकारने काढलेला ओबीसी समाजाच्या राजकीय अध्यादेश टिकला पाहिजे, सरकारने आगामी निवडणुकांसाठी तो टिकवून दाखवावा, तसं झालं तर आम्ही सरकारचं कौतुक करु, पण, ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं नाही, तर रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशारा पंकजा यांनी सरकारला दिला आहे.

 

Web Title : OBC Reservation | obc reservation chief minister you removed caste gave reservation maratha community pankaja munde in aurangabad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | मुळा-मुठा नदी सुशोभीकरण प्रकल्प ! संगम पूल ते येरवडा अंदाज पत्रक बनविण्यास स्थायी समितीची मान्यता

IPP Bank Recruitment | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत ‘या’ पदांसाठी भरती, 2.6 लाख रूपयांपर्यंत पगार, जाणून घ्या सविस्तर