WhatsApp आणणार ट्विटर, इन्स्टाग्राम आणि सिंगल अ‍ॅपसारखं खास फीचर !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – WhatsApp | सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp)आपल्या युजर्ससाठी अनेक नवनवीन फीचर आणत असते. काही दिवसांपूर्वी पेमेंट सुविधाही सुरु केली होती. त्यानंतर आता ट्विटर (Twitter), इन्स्टाग्राम (Instagram) आणि सिंगल (Signal) अ‍ॅपसारखं खास फीचर आणणार आहे.

मेसेज रिअ‍ॅक्शन फीचरवर कंपनी सध्या काम करत आहे. युजर्स चॅटमध्ये आलेल्या मेसेजवर या फीचरद्वारे रिअ‍ॅक्शन देऊ शकतील. यामुळे चॅट एक्सपिरिअन्स अधिक मजेशीर होऊ शकेल. फेसबुक आणि त्याच्या मेसेंजर अ‍ॅपमध्ये हे फीचर आहे. सध्या हे फीचर टेस्टिंग फेजमध्ये असून लवकरच युजर्ससाठी रोलआउट केलं जाणार आहे.

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, इतर अ‍ॅप्सप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅप ही मेसेज रिअ‍ॅक्शन फीचर आणणार आहे. हे सध्या इंटरनल टेस्टिंगचा भाग आहे, त्यामुळे बीटा युजर्ससाठीही हे फीचर उपलब्ध नाही. तसंच हे फीचर रोलआउट झाल्यानंतरही केवळ व्हॉट्सअ‍ॅपचं लेटेस्ट वर्जन वापरणाऱ्या युजर्ससाठी उपलब्ध असेल. यासंदर्भात WABetaInfo ने स्क्रिनशॉट पोस्ट केला आहे. ज्यात एक एरर मेसेज असून हीच या नव्या फीचरसाठीची पहिली स्टेप असू शकते असं सांगण्यात येत आहे. हे नवं फीचर केवळ अँड्रॉईड युजर्ससाठीच नसून आयफोन, वेब आणि डेस्कटॉप वर्जनवरही याचा वापर केला जाऊ शकतो असंही सांगण्यात येत आहे.

हे देखील वाचा

Upcoming IPOs | सप्टेंबरमध्ये येताहेत आणखी 2 कमाईच्या संधी, जाणून घ्या किती रुपयांची करावी लागेल गुंतवणूक?

Gold Price Today | आज ‘स्वत’ झाले सोने-चांदी, जाणून घ्या किती घसरण झाली किमतीत?

Earn Money | केवळ एक एकरच्या शेतीत 6 लाख रुपयांची करा कमाई, सरकार सुद्धा करेल मदत; जाणून घ्या

Ajit Pawar | बारामती दौऱ्यावर असताना अजितदादांनी घेतली चक्क इलेक्ट्रीक रिक्षाची ट्रायल (व्हिडीओ)

CBSE ने बोर्ड परीक्षा पॅटर्नमध्ये केला मोठा बदल, यावर्षी दोन टप्प्यात होईल परीक्षा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  WhatsApp will bring special features like Twitter, Instagram and Single App! 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update