मालिकेत काम हवंय, मग पहिलं माझ्या समोर ‘नग्न’ व्हावं लागेल, ‘या’ मराठी अभिनेत्रीनं वस्तुस्थितीचं केलं ‘कथन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फिल्म इंडस्ट्री असं जग आहे ज्यात येण्यासाठी आणि आपलं स्वप्न करण्यासाठी अनेकजण झगडत असतात. ही दुनिया जेवढी ग्लॅमरस दिसते तेवढीच आतून ती कडवट आहे. अनेक अभिनेत्रींनी इंडस्ट्रीतील आपल्या वाईट अनुभवांबद्दल सांगितलं आहे. बॉलिवूडमधील असे अनेक किस्से आपण ऐकले असतील. यानंतर आता टीव्ही इंडस्ट्रीतील असाच किस्सा समोर आला आहे.

अभिनेत्री सोनल वेंगु्र्लेकरने आपला अनुभव सांगितला आहे. सोनलची ही मूळची मुंबईची आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच सोनलने मॉडेलिंगला सुरुवात केली. याचवेळी ती एका मालिकेच्या ऑडिशनला गेली होती. यावेळी ती अवघ्या 19 वर्षांची होती. ऑडिशनच्या वेळी तिला राजा बजाजने एका बंद खोलीत बोलावून घेतले. त्यावेळी राजा बजाज मद्यधुंद अवस्थेत तिच्याकडे जी मागणी केली आणि त्यानंतर जे झालं ही सर्व कहाणी सोनलने एका पोस्टमधून सांगितले आहे.

सोनलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर राजा बजाज तिला काय म्हटला हे सांगितले आहे. आपल्या पोस्टमध्ये सोनल म्हणते, “अभिनय येत नसला तरी तू दिसायला सुंदर आहे. त्यामुळे तुझी काम करायची इच्छा असेल तर मी काम द्यायला तयार आहे. फक्त तू नग्न होऊन माझ्यासमोर ये.” असं बजाज तिला म्हणाला. इतकेच नाही तर तुला तांत्रिक विद्या शिकवेन असे सांगत त्याने जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न केला असेह सोनालीने पोस्टमध्ये म्हटले आहे.

सोनल या प्रसंगाने खूपच घाबरून गेली. सोनलने लगेचच तेथून पळ काढला. त्याचवेळी तिथे एक मॉडेल तिच्या आईसोबत ऑडिशनसाठी आली होती. त्यांनीही सोनलला मदत केली. सोनालीने या प्रकरणी पोलिसांत तक्रार केल्याचेही तिने सांगितले. पोलिसांनी मात्र भलतीच केस दाखल केली इतकेच नाही तर कारवाई करण्यास त्यांनी टाळाटाळ केल्याचेही सोनलने स्पष्ट केले आहे.

सोनलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, तिने दिल दोस्ती डान्स, शास्त्री रिटर्न्स, ये वादा रहा अशा अनेक मालिकेत काम केलं आहे.

 

Visit : policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like