जेव्हा सेल्फीच्या बहाण्यानं सारा अली खानला Kiss करू लागला फॅन ! व्हिडीओ ‘व्हायरल’

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार सारा अली खान वेगानं पुढे येणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. अलीकडेच साराचा एक थ्रोबॅक फोटो समोर आला होता ज्यात ती तिचा भाऊ इब्राहिम सोबत दिसली होती. अशातच आता तिचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. यात असं काही झालं की, साराच नाही तर उपस्थित सर्व लोक हैराण झाले.

समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, सारा जीमसाठी जात होती. अशात एका चाहत्यानं हात मिळवण्याच्या बहाण्यानं हात धरला आणि हातावरच किस करू लागला. हे पाहून सारा एकदमच घाबरली. साराचा बॉडीगार्ड तर त्या चाहत्यावर धावूनच गेला. यानंतर सारानं अचानक हात मागे घेतला आणि नमस्ते करत प्रसंग टाळला.

साराचा हा व्हिडीओ जुना असला तरी सोशल मीडियावर व्हायल होताना दिसत आहे.अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिली आहे. अनेकांनी त्या चाहत्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सारानं ज्या पद्धतीनं रिअॅक्ट केलं त्यावरून तिचं कौतुक होताना दिसत आहे.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करत आहे. या सिनमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष असणार आहेत.