जेव्हा घर चालवण्याठी जरीन खाननं केलं कॉल सेंटरमध्ये काम ! फिगरवरूनही ऐकलेत ‘टोमणे’

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार जरीन खान बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव आहे. सलमान खानसोबत वीर सिनेमातून तिनं करिअरला सुरुवात केली होती. असं असलं तरी तिलाही खूप स्ट्रगल करावा लागला आहे. आपल्या आर्थित तंगीमुळं तिला शिक्षण अर्ध्यात सोडावं लागलं होतं.

जरीनला डॉक्टर व्हायचं होतं. परंतु परिस्थिती पाहता तिला नोकरी करावी लागली. 23 व्या वर्षीच तिनं फिल्मी दुनियेत पाऊल टाकलं होतं. याआधी तिला नाविलाजानं कॉल सेंटरमध्ये काम करावं लागलं आहे. अनेकदा तिला बॉडीवरूनही टोमणे ऐकावे लागले आहेत.

जेव्हा जरीन कॉल सेंटरमध्ये काम करत होती तेव्हा ती मॉडेलिंग सुद्धा करत होती. ती काम करून घरातील खर्च काढत असे. जरीन खान तिच्या यशाचं पूर्ण श्रेय सलमान खानला देते. ती म्हणते, मी वीरमध्ये सलमान खानची हिरोईन होते म्हणून मला सर्व ओळखतात.” तिनं एकदा असंही सांगितलं आहे की, जेव्हा ती सलमान सोबत काम करत होती तेव्हा तिला विश्वास होत नव्हता की, ती त्याच्यासोबत काम करत आहे.

जरीनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिने 2010 साली आपल्या करिअरला सुरुवात केली होती. सलमानच्या वीर या सिनेमातून तिने डेब्यू केला होता. यानंतर जरीननं बॉलिवूडमधील हाऊसफुल 2, रेडी, हेट स्टोरी 3, अक्सर 2 आणि 1921 यांसारख्या सिनेमात काम केलं आहे. बॉलिवूडसोबतच जरीन खानने अनेक पंजाबी आणि तमिळ सिनेमात काम केलं आहे. जरीन ढाका या पंजाबी सिनेमात दिसली आहे. याशिवाय जरी सलमान खानचा रिअॅलिटी शो बिग बॉस 13 मध्ये दिसली आहे.