बेवारस इंदापूर नगरपरिषेदेला मुख्याधीकारी मिळणार कधी?, बहुजन मुक्ती पार्टीचे गाढवासह आंदोलन

इंदापूर – इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधीकारी डाॅ.प्रदिप ठेंगल यांची बदली झाल्याने इंदापूर नगरपरिषदेतील प्रशासकीय कामकाज रामभरोसे सुरू आहे. प्रभारी मुख्याधीकारी म्हणुन इंदापूर नगरपरिषदेचा कारभार दौंडच्या मुख्याधीकार्‍यांकडे सोपविण्यात आल्याने ते इंदापूर नगरपरिषदेचा कारभार दौंडमध्ये बसुन चालवित आहेत.परिणामी इंदापूर शहरातील नागरिकांची कामे मोठ्या प्रमाणात खोळंबल्याने संताप व्यक्त होत आहे.नागरिकांना कामविषयी हेलपाटे मारावे लागत असल्याने नगरपरिषदेत कामकाज गोंधळलेल्या स्थितीत आहे. नागरिकांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. सध्या नगरपरिषद कार्यालय हे मुख्याधीकार्‍याविना बेवारस असल्याने नगरपरिषदेला नविन मुख्याधीकारी वारस मिळावा यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने गाढवासह आंदोलन करून नगरपरिषदेत तात्काळ मुख्याधीकारी नुयुक्त करण्याची मागणी केली.

इंदापूर नगरीचे प्रथम नागरिक व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष,व जनतेने निवडून दीलेले लोकसेवक नगरपरिषदेकडे कसलेही फिरकत नसल्याने लोकप्रतिनिधींच्या कामकाजाविषयी नागरिकांमधुन शंका व्यक्त होत आहे.तर आनेकांनी नगपरीषदेची कामे घेतली असुन मार्चअखेर कामे पूर्ण करून बीले लवकर निघावीत व ६०-४० च्या नादात पळापळ सुरू असल्याने नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींना वेळ मीळत नसल्याची चर्चा इंदापूर शहरात जोर धरत आहे. नगराध्यक्ष हे घरी बसुन नगरपरिषदेचा कारभार हाकत असुन नागरिकांना अडीअडचणीच्या कामासंदर्भात भेटण्यासाठी नगराध्यक्षांच्या घरी हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिकामधुन नाराजी व्यक्त होत आहे.

नगरपरिषदेत कामकाजाविषयी सध्या गोंधळाची स्थिती आहे.नागरिकांना अडचणीना सामोरे जावे लागत आहे.तर मागील दोन महिण्यापासुन इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधीकारीपद रिक्त झाले आहे.शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन नगरपरिषदेला मुख्याधीकारी नसल्याने प्रशासकीय कामांचाही मोठ्या प्रमाणात खोळंबा होत असल्याने बहुजन मूक्ती पार्टीच्या वतीने इंदापूर नगरपरिषदेला मुख्याधीकार्‍याची तात्काळ नियुक्ती व्हावी या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने गाढवासह आंदोलण करण्यात आले व तात्काळ मुख्याधीकारी नुयुक्त करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी संतोष क्षिरसागर, संजय शिंदे, सुरज धाईंजे नानासाहेब चव्हांण नागेश भोसले वसिम शेख राहुल शिंगाडे उमेश ढावरे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.