Covid Vaccine घेणार्‍यांनी कधीपर्यंत पिऊ नये दारू? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

नवी दिल्ली : दारू पिण्यार्‍यांच्या मानत हाच प्रश्न असतो की, कोरोना व्हॅक्सीन घेण्यापूर्वी किंवा घेतल्यानंतर कधीपर्यंत दारू पिऊ नये? कोविडवर पंजाबच्या तज्ज्ञ समितीचे प्रमुख डॉ. के. के. तलवार यांनी याबाबत माहिती दिली. डॉक्टर तलवार यांनी म्हटले की, शास्त्रीय निरिक्षणाच्या आधारावर ही शिफारस केली जाते की, लोकांनी कोविडविरोधी लस घेण्याच्या 2 दिवस अगोदर आणि नंतर 2 दिवसापर्यंत दारूचे सेवन टाळले पाहिजे.

या दरम्यान डॉक्टर तलवार यांनी दारू आणि कोरोनाशी संबंधीत अफवांवर सुद्धा चर्चा केली. डॉ. के. के. तलवार यांनी म्हटले, सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांकडे लक्ष देऊ नका. दारू कोरोना व्हायरसपासून सुरक्षा प्रदान करते ही अफवा आहे.

त्यांनी म्हटले की, जास्त दारू प्यायल्याने लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो. तलवार म्हणाले की, त्यांनी सोशल मीडियावर वाचले की, दारूचे सेवन व्हायरस विरुद्ध सुरक्षा प्रदान करू शकते. त्यांनी म्हटले अशाप्रकारच्या चुकीच्या माहितीमुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.

डॉक्टर तलवार म्हणाले, हा सल्ला चुकीचा आहे की दारूच्या सेवनाने कोरोना व्हायरस मरतो. मात्र, ते म्हणाले, खुप कमी मात्रेत दारूचे सेवनाने कोणतेही नुकसान नाही.