सेल्फी काढताना विवाहितेचा इंद्रायणीत गेला ताेल

आळंदी : पाेलीसनामा ऑनलाईन

सेल्फीचा अनावश्यक नाद तुमच्या जीवावर उठू शकतो… अशीच एक घटना अाळंदी येथे घडली. इंद्रायणी नदीच्या किनारी सेल्फी काढताना विवाहितेचा इंद्रायणी नदीत ताेल गेला. या महिलेला बुडताना आणि वाहत जाताना पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्यां दाेन तरूणांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे महिलेबराेबर एक तरूणही वाहून गेला. सदर घटना इंद्रायणी नदीवरील सिद्धबेट बंधाऱ्या नजीक नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावर घडली.
[amazon_link asins=’B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d32f759d-9fe5-11e8-a549-0de7a23a80ec’]

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आळंदी येथे सिद्धबेट बंधाऱ्यां जवळ  बाह्यवळण रस्त्याला जोडण्यासाठी इंद्रायणी नदीवर पूल उभारण्यात आला आहे. या पुलाजवळच इंद्रायणी नदीचा सुंदर परिसर असल्याने येथे स्लेफी काढण्यासाठी लाेकांची गर्दी असते. मंगळवारी सायंकाळी पुलावरून सेल्फी काढत असताना एका विवाहीतेचा ताेल गेला व  ती नदीच्या वाहत्या पाण्यात कोसळली दरम्यान तेथे उपस्थित असलेल्या चंद्रकांत पंडित गायकवाड व पवन संतोष ठाकरे यांनी तिला वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने हे दाेन तरण  देखील प्रवाहा सोबत वाहून गेले. यावेळी स्थानिकांच्या व पोलिसांना मदतीने पवनला वाचविण्यात यश आले तर चंद्रकांत गायकवाड व महिला प्रवाहा सोबत वाहून गेली. वाहून गेलेल्या दोघांचा शोध सुरु आहे.

एका तरुणाला वाचविण्यात यश आल्याचे आळंदी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी सांगितले.