Coronavirus : WHO चा मोठा खुलासा : वुहानच्या लॅबमधून नव्हे तर प्राण्यांपासूनच मनुष्याला कोरोनाचा संसर्ग

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  कोरोनाला कारणीभूत ठरलेला विषाणू वटवाघुळांकडून इतर प्राण्यांमध्ये संक्रमित झाला आणि त्यानंतर त्याची मानवाला लागण होऊन तो जगभर पसरला असा अहवाल WHO ने प्रसिध्द केला आहे. कोरोना विषाणूच उगमस्थान आणि प्रसाराची कारणमिमांसा करण्यासाठी WHO चे एक विशेष पथक चीनमध्ये गेले होते. या पथकाने व्हायरस संदर्भातील संशोधन करुन त्याचा अहवाल WHO कडे सोपवला आहे.

वुहान प्रांतामध्येच जगातील पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. त्यामुळे यामागे वुहानमधील प्रयोगशाळाच कारणीभूत असल्याचे आरोप केले गेले. डिसेंबर 2019 मध्ये पहिला रुग्ण समोर आल्यानंतर कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरला. दुसऱ्याबाजूला कोरोना संदर्भातील माहिती लपविल्याचा आरोप चीनवर वारंवार होत होता. दरम्यान, चीनने व्हायरसच्या प्रसाराबाबत हात झटकून याचा प्रसार सी-फूडमधून झाल्याचे जाहीर केले होते. चीनच्या याच दाव्याचा अभ्यास करण्यासाठी WHO चे पथक चीनला गेले होते. असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला WHO चे सदस्य देश असलेल्या जिनेव्हास्थित एका अधिकाऱ्यांपासून अहवालाचा ड्राफ्ट हाती मिळाला. दरम्यान नेमका हाच अहवाल अंतिम स्वरुपाचा असून तोच जाहीर केला जाईल की नाही याबाबद अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. अहवालात 4 मुद्द्यांवर सखोल संशोधन झाले असून यातून व्हायरसच्या प्रसाराबाबतची कारणमिमांसा केली आहे. कोरोना विषाणू थेट वटवाघळांकडून मानवात संक्रमित झाल्याची शक्यता खूप कमी असल्याचा निष्कर्ष वैज्ञानिकांनी मांडला आहे. सुरुवातीला वटवाघळांकडून इतर प्राण्यांमध्ये कोरोना व्हायरसच संक्रमण झाले. त्यानंतर त्या प्राण्यांच्या माध्यमातून व्हायरस मानवात संक्रमित झाल्याचं वैज्ञानिकाचे म्हणणे आहे. कोल्ड चैन फूड प्रोडक्ट्सच्या माध्यमातून व्हायरचा प्रसार वेगाने झाल्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे.