दिल्लीतील बुराडी येथील भाटिया कुटुंबातील ‘या’ सदस्यानेही सोडले प्राण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

माणसाप्रमाणेच मुक्या प्राण्यांनाही घरातील माणसांचा जिव्हाळा असतो. घरातील एखादी व्यक्ती दिसेनाशी झाली तर मुक्या प्राण्यांचाही जीव व्याकूळ होतो. असाच प्रत्यय दिल्लीमध्ये आला. दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी बुराडी येथील भाटिया कुटुंबातील ११ सदस्यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या कुटुंबाचा सदस्य पाळीव कुत्र्याला घरातील सदस्यांचा विरह सहन न झाल्याने त्यानेही आपले प्राण सोडले.

[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b62c55df-8e65-11e8-8033-dd817b765029′]

बुराडी येथील ११ कुटुंबीयांनी रहस्यमयरीत्या गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर या कुटुंबीयांचा ‘टॉमी’ हा कुत्रा चर्चेत आला होता. कुटुंबातील सगळ्याच सदस्यांचा मृत्यू झाल्याने धक्का बसलेल्या या टॉमीला नोएडा येथील ‘हाऊस ऑफ स्ट्रे अॅनिमल्स’ या संस्थेमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र त्याला इथे आणल्यापासूनच तो अस्वस्थ होता. त्याने अन्नपाणी सोडले होते. त्याच्यावर इलाज करण्यात येत होता. मात्र अखेरीस रविवारी (दि.२२) संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. हृदयविकारच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

३० जूनच्या रात्री बुराडी येथील भाटिया कुटुंबातील ११ सदस्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले होते. त्यावेळी या कुटुंबीयांचा पाळीव कुत्रा टॉमी हा घराच्या घराच्या टेरेसवर बांधून ठेवलेला होता. या सामुहीक आत्महत्येचे वृत्त पसरताच बुराडीच नाही तर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. दरम्यान, या कुटुंबीयांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. अखेरीस पोस्टमॉर्टेम अहवालातून या कुटुंबीयांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.

जाहिरात