‘या’ कारणामुळं तुटली ‘किंग’ खान आणि अजय देवगणची मैत्री, 31 वर्षात एकही सिनेमा नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कुछ कुछ होता है यास सिनेमात बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि काजोल यांची जोडी खूप गाजली. आजही ते चांगले मित्र आहेत. गेल्या 25 वर्षांपासून ते मित्र आहेत. तुम्हाला हे माहिती आहे का काजोलचा पती अभिनेता अजय देवगण आणि शाहरुख हे केवळ हाय हॅलोपरतेच मित्र आहेत. 31 वर्षांच्या बॉलिवूडमधील आपल्या करिअरच्या काळात अजय आणि शाहरुखनं एकदाही एकत्र सिनेमा केलेला नाही. यामागील कारण आज आपण जाणून घेणार आहोत. 1995 मध्ये असं काही घडलं की, दोघांच्या मैत्रीत अंतर आलं.

राकेश रोशन यांनी 1995 साली करण अर्जुन हा सिनेमा करायला घेतला. यासाठी त्यांनी सनी देओल आणि अजय देवगणला साईन केलं. परंतु ऐनवेळी सनीनं या सिनेमासाठी नकार दिला. यानंतर राकेश यांनी शाहरुखला फायनल केलं. जेव्हा अजयनं कथा ऐकली तेव्हा त्यानं शाहरुखची भूमिका त्याला द्यावी असं सांगितलं. कारण त्याची भूमिका दमदार होती. राकेश यांनी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचं ठरवलं. यासाठी शाहरुख आणि अजय एकत्र बसले. परंतु दोघांनीही हा सिनेमा सोडण्याचं ठरवलं. अजयनं सिनेमा सोडला. महिन्याभरानंतर अजयला कळलं की, शाहरुख मात्र हा सिनेमा करत आहे. त्याला हे ऐकून धक्काच बसला. नंतर त्यांच्यात कोल्ड वॉर सुरू झालं. यानंतर त्यांनी कधीच एकत्र काम केलं नाही.

अजय आणि शाहरुख दोघांपैकी कोणीही कधीच आपला वाद लोकांसमोर येऊ दिला नाही. परंतु 2012 साली अजयचा सन ऑफ सरदार हा सिनेमा रिलीज झाला. याच दिवशी शाहरुखचा जब तक है जान सिनेमा रिलीज झाला. दोन्ही सिनेमे एकमेकांवर भारी पडले होते. असे असले तरी एक्सपर्टनी असं मत व्यक्त केलं की, जर हे सिनेमे वेगळ्या तारखेला रिलीज झाले असते तर जास्त कमाई करू शकले असते. यावेळी अजयनं आपली खदखद व्यक्त केली. अजय म्हणाला होता की, “यशराजनं आपली प्रतिष्ठा आणि पॉवर पणाला लावून शाहरुखच्या जब तक है जान या सिनेमाला जास्त स्क्रिन्स मिळवून दिल्या. यामुळे माझ्या सन ऑफ सरदार या सिनेमाला जास्त स्क्रिन्स मिळू शकल्या नाहीत.”