ऋषी कपूर 3 वर्षांपूर्वी असं का म्हणाले होते- ‘जेव्हा मी मरेन… कोणीही मला खांदा द्यायला येणार नाही’ !

पोलिसनामा ऑनलाइन –हिंदी सिनेमातील वेटरन अ‍ॅक्टर ऋषी कपूर यांनी दि 30 एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांना जाऊन एक आठवडा झाला आहे. परंतु चाहते त्यांना आजही मिस करत आहेत. त्यांनी याआधी ट्विटरवरून जे काही बोललं होतं ते पुन्हा एकदा चर्चेत येताना दिसत आहे.

https://twitter.com/30Kumaar/status/1258296299918708737?s=20

तीन वर्षांपूर्वी जेव्हा दिग्गज अभिनेता विनोद खन्ना यांचं निधन झालं होतं तेव्हा या कोणीही नव्या पिढीतील अ‍ॅक्टर त्यांच्या अंतिम संस्कारात सहभागी न झाल्यानं ऋषी कपूर खूप भडकले होते. त्यावेळी त्यांनी अशा कलाकारांवर सडकून टीका केली होती.

https://twitter.com/30Kumaar/status/1258296445561643008?s=20

ऋषी यांनी ट्विट करत लिहलं होतं की, लाजीरवाणं ! या पिढीतील एकही कलाकार विनोद खन्नांच्या अंत्य यात्रेत सहभागी झाला नाही. तेही तेव्हा जेव्हा त्यांनी एकत्र काम केलं आहे. इज्जत करायला शिकायला हवं.

आणखी एका ट्विटमध्ये ते म्हणाले होते की, “असं का ? मी मेल्यानंतरही…. जेव्हा मरेन तेव्हा मला या गोष्टीसाठी तयार रहायला हवं की, कोणीही मला खांदा द्यायला येणार नाही. आजच्या कथित स्टार्सवर मी नाराज आहे.” ऋषी किती नाराज होते ते यावरून समजतं की, त्यांनी पहिलं ट्विट हे 11.53 वाजता केलं होतं आणि दुसरं रात्री एक वाजता.