पत्नीने पतीला कथा ऐकण्यासाठी बोलावले अन् दिरासोबत मिळून केली हत्या

बरेली : वृत्तसंस्था – बरेली येथील खुदागंज येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला. एका पत्नीने तिच्या पतीला कथा ऐकण्यासाठी बोलावले होते अन् जेव्हा पती त्यासाठी उपस्थित राहिला तेव्हा पत्नीने तिच्याच दिराच्या मदतीने पतीचा खून केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

ओमकार असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. त्याचा मृतदेह 5 फेब्रुवारीला शेतात सापडला. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरु केला तेव्हा मोठा खुलासा झाला. पोलिसांनी सर्व्हिलान्स टीमच्या मदतीने ओमकारची पत्नी भूरीच्या फोनची माहिती काढली. तेव्हा भूरी आणि तिचा दीर या दोघांमध्ये संभाषण झाल्याचे समजले. जेव्हा पोलिसांनी कसून चौकशी केली असता ओमकारची पत्नी भूरी आणि तिच्या दिराचे प्रेमसंबंध उघड झाले. त्यामुळे या दोघांनी मिळून ओमकार याचा गळा दाबून खून केला.

‘तो’ 15 वर्षांचा संसार…
ओमकार आणि त्याची पत्नी भूरी यांच्या लग्नाला 15 वर्षे झाली होती. त्यांचा संसारही चांगला सुरु होता पण नव्या प्रेमाच्या हव्यासापोटी तिने तिच्या पतीचा खून केला.

पतीला भागवत कथा ऐकण्यासाठी बोलावले अन्…
भूरीने ओमकारला भागवत कथा ऐकण्यासाठी बोलावले आणि शेतात घेऊन गेली. तसेच हत्या करताना तिने ओमकारचा हात पकडला आणि दिराने गळा दाबला. इतकेच नाही तर दिर ओमकारच्या अंगावरही बसला होता, असा जबाब ओमकारच्या पत्नीने दिला.