‘प्रेग्नंट’ पत्नीच्या मृत्यूचा थरार त्यानं पाहिला डोळयानं, ‘लाचार’ होता म्हणून…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – बसमध्ये एकाच सिटावर बसलेल्या आपल्या गर्भवती पत्नीचा आपल्या डोळ्यांसमोर अश्या पद्धतीने मृत्यू होईल याची कल्पनादेखील कधी केली नाही, अशी भावना मालेगाव कळवण बस अपघातातून बचावलेला अमोल अहिरे याने व्यक्त केली. एक वृत्त वाहिनीशी बोलताना अमोल याला आपले अश्रू अनावर झाले.

सामाजिक कार्यकर्ता असलेला अमोल अहिरे चिराई (ता. बागलाण) येथील रहिवासी आहे, तो एका खासगी कंपनीच्या डिश टीव्ही विक्रीचे काम करतो. आठ महिन्यांपूर्वीच आमोल आणि शीतलचा विवाह झाला होता. लग्नानंतर आता शीतलला दिवस गेल्याने त्यांच्या घरात नवीन पाहुणा येणार होता. मंगळवारी (ता. 28) वैद्यकीय तपासणीसाठी दोघे सोबत गेले होते. तपासणी झाल्यानंतर बाळाची प्रकृतीसोबतच सर्वकाही ठीक असल्याचे समजताच दोघांनाही अतिशय आनंदी झाला. परंतु नशिबात काही वेगळेच लिहिले होते.

मालेगावहून धुळे-कळवण बसमध्ये मेशी गावाजवळ अचानक बस हेलकावे खात असल्याचे जाणवले. आणि काही कळण्याच्या आतच बस विहिरीत पडली. या अपघातात गर्भवती शीतलचा मृत्यू झाला. बुधवारी जड मनाने मृत शीतलवर अंत्यसंस्कार करण्यात आले.