‘बॉयफ्रेन्ड’ पती बनताच संपुर्णपणे बदलला ! बलात्कार करण्यास सुरूवात, त्यानंतर झालं ‘असं’ काही ‘बस्स’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खूप दिवस चाललेल्या कोर्टाच्या प्रक्रियेनंतर पत्नीला आपल्या पतीला सोळा वर्षांची शिक्षा देण्यात यश आले आहे. त्या महिलेने सांगितले की, लग्नाच्या आधी त्यांनी गरेथ रेनबो नावाच्या व्यक्तीसोबत चांगलाच रोमांस केला. परंतु लग्नानंतर बॉयफ्रेंडचे पतीमध्ये रूपांतर होताच तो चांगला बदलला.

महिलेने सांगितले की, तो तिला म्हणायचं माझ्याशी शारीरिक संबंध ठेवणे तुझी ड्युटी आहे आणि त्याने माझ्यावर घरात बलात्कार केला. अशात त्या महिलेने न्यायालयात धाव घेतली आणि मोठ्या संघर्षाने त्या विरोधात खटला दाखल केला.

ब्रिटेनच्या साउथ वेल्स मधील महिलेने सांगितले की, त्याने २०१५ साली माझ्यावर हल्ला केला होता आणि त्यानंतर मे महिन्यात त्यांना २१ महिन्यांची शिक्षा झाली.

जेलमधून परत येताच आरोपीने त्या महिलेवर हल्ला केला आणि तिच्या घरात घुसून पुन्हा तिचा बलात्कार केला आणि त्यानंतर त्याने दारू सुद्धा पिली.

या घटनेनंतर महिलेने पोलिसांनी फोन केला आणि पोलिसांनी तातडीने येऊन त्या महिलेच्या पतीला ताब्यात घेतले. शेवटी ३६ वर्षीय गरेथ रेनबो यांना ब्रिटनच्या न्यायालयाने १६ वर्ष जेलमध्ये राहण्याची शिक्षा सुनावली.

२०१९ फेब्रुवारी मध्ये कोर्टाने त्या व्यक्तीला आरोपी घोषित करत सांगितले की, तुमच्याकडे महिलांसाठी कोणतीही इज्जत नाही. कोणत्याही महीलेसोबत तुम्ही राहिलात तर तिला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोर्टाने रेनबो यांना कोणत्याही महिलेला भेटण्यास मज्जाव केला.

आरोग्यविषयक वृत्त –