‘खिलाडी’ अक्षय कुमार साकारणार पीव्ही सिंधूच्या बायोपिकमध्ये प्रशिक्षकाची ‘भूमिका’ , गोपीचंद म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पीव्ही सिंधूने जपानच्या नोजोमी ओकुहारा ला हरवून बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनमध्ये गोल्ड जिंकून इतिहास रचला आहे. या विजयानंतर सिंधू असं करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे आणि यानंतर आता सिंधूच्या बायोपिकला घेऊन चर्चांना उधाण आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, बायोपिकमध्ये अक्षय कुमार सिंधूचे कोच पुलेला गोपीचंद यांच्या भूमिका साकारू शकतो.

वृत्तवाहिन्यांशी बोलताना पुलेला गोपीचंद यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “मला अक्षय कुमार आवडतो. जर ते असं करणार असतील तर चांगलंच आहे. अक्षय त्या अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांच्यापासून मी खूप प्रभावित आहे. परंतु मी याबाबत खात्रीशीर काही सांगू शकत नाही.”

गोपीचंद भारतीय बॅडमिंटन टीमचे प्रमुख राष्ट्रीय कोच आहे. ते माजी ऑल इंग्लंड चॅम्पियन आहेत. त्यांनी अनेक अवॉर्ड्सही मिळवले आहेत. त्यांना 1999 मध्ये अर्जुन अवॉर्ड, 2001 मध्ये राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड, 2009 मध्ये द्रोणाचार्य अवॉर्ड आणि 2014 साली पद्मभूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

सिंधूच्या ऐतिहासिक विजयानंतर अक्षयने ट्विटरवर तिला शुभेच्छाही दिल्या होत्या. त्याने लिहिलं होतं की, “BWF चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळवणारी पहिली भारतीय झाल्याबद्दल पीव्ही सिंधूला खूप खूप शुभेच्छा. हा एक ऐतिहासिक विजय आहे. तू शानदार खेळलीस.”

आरोग्यविषयक वृत्त –