‘भाईजान’ सलमानच्या ‘दबंग ३’मध्ये दिसण्याबाबत ‘मलायका’चा मोठा ‘खुलासा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाईजान सलमानच्या दबंग सिनेमाच्या पहिल्या पार्टमध्ये मलायका अरोराने आयटम साँग मुन्नी बदनाम केलं होतं. हे गाणं चांगलंच गाजलं होतं. यानंतर आता सलमान खानचा दबंग 3 येणार आहे. सध्या या सिनेमाची तयारी सुरु आहे. चाहत्यांना उत्सुकता आहे की, दबंग 3 या सिनेमातही मलायका अरोरा दिसणार आहे का ? सलमानच्या सिनेमात पुन्हा एकदा मलायका आयटम साँग करताना दिसणार का ? यावर मलायकाने भाष्य केलं आहे.

एका वृत्तपत्राशी बोलताना मलायका अरोराने खुलासा केला आहे की, ती दबंग 3 चा हिस्सा बनणार नाही. मलायका म्हणाली की, “या प्रोजेक्टशी संबंधित सर्व लोक पुढे गेले आहेत. मी या व्हेंचरसाठी सर्वांना शुभेच्छा देते.” वर्कफ्रंटबद्दल बोलताना मलायका म्हणाली की, “मला माझ्या कंपनीद्वारे चांगल्या कंटेटची निर्मिती करायची आहे.”

मलायका पुढे म्हणाली की, “मी एक शॉर्ट मूव्ही प्रोड्युस करू शकते. परंतु सध्या असे काही नाही. माझ्याकडे अनेक चांगल्या आयडियाज आहेत. परंतु आताही मी थोडा वेळ घेत आहे.” मलायका अरोरा सध्या टीव्ही सक्रिय असते. अनेक रिअॅलिटी शो मध्ये ती जज करताना दिसते. पर्सनल कमिटमेंट्सपेक्षा मलायका अरोरा पर्सनल अफेअर्समुळे जास्त चर्चेत असते.

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर आता मलायका अरोरा अॅक्टर अर्जुन कपूरला  डेट करत आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुनच्या वाढदिवशी मलायकाने त्याच्यासोबतचे नाते ऑफिशयल केले होते. दोघे अनेकदा सोबत हँगआऊट करताना स्पॉट होत असतात. लवकरच दोघेही लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

केसगळती होतेय का ? ‘हे’ ६ साधे-सोपे घरगुती उपाय करा

आंब्यातील कोय फेकू नका, उपयोगात आणल्यास करेल औषधाचे काम

‘सुपारी’ खाऊन ‘या’ ४ आजारावर करा कंट्रोल, जाणून घ्या

आरोग्यासंदर्भातील ‘या’ महत्वाच्या ११ प्रश्‍नांची उत्‍तरे आवश्य जाणून घ्या !

सावधान !  लहान मुलं सतत मोबाईल घेत असतील तर ‘हे’ नक्की वाचा

‘या’ ४ घरगुती उपायांनी करा कुरळे ‘केस’ सरळ

Loading...
You might also like