पाण्याचे नियोजन चार दिवसात मार्गी लावू : आयुक्तांचे खा. शिरोळे यांना आश्वासन

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन – मला चार दिवसांची मुदत द्या. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे शहराचा पाणी पुरवठा मार्गी लावू असे आश्वासन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी खासदार शिरोळे यांना रविवारी (आज) दिले.

शहरातील पाणी प्रश्नाचा आढावा घेण्यासाठी आज बैठक घेण्यात आली. बैठकीला खा.अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त सौरभ राव, पाणी पुरवठा खात्याचे सर्व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पाणीकपात वेळापत्रकाचा विस्तृत आढावा घेण्यात आला. ज्या भागात आत्ता पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे, तिथे चार दिवसात प्राधान्याने उपाययोजना केल्या जातील असे आयुक्तांनी सांगितल्याची माहिती खा.शिरोळे यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

शहरात पाणीकपात लागू केल्यानंतर शिवाजीनगर भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. शुक्रवारी संध्याकाळी तेथील रहिवाशांनी खा.शिरोळे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी आंदोलकांसमोर बोलताना पालिकाभवनासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा शिरोळे यांनी दिला होता. त्यावेळी महापौरांच्या विनंतीवरून उपोषण मागे घेतले आणि ही बैठक घेण्याचे ठरले होते.

दरम्यान, भिजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनेनी पाणी प्रश्नावर उद्या (सोमवारी) सकाळी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे.