Will Smith | ‘ब्रेकअपनंतर मी असंख्य महिलांशी सेक्स केलं’; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Will Smith | प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता विल स्मिथचे (Will Smith) जगभरात खूप चाहते आहेत. पर्सुट ऑफ हॅपिनेस (Pursuit of Happiness), मेन इन ब्लॅक (Men in Black) यासारख्या चित्रपटांमध्ये त्याने आपल्या दमदार अभिनयाने आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. विल स्मिथ (Will Smith) सध्या त्याच्या आत्मचरित्रामुळे (Autobiography) चर्चेत आला आहे. विल स्मिथ याने आपल्या आत्मचरित्रात त्याने त्याच्या खासगी आयुष्याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने यामध्ये पहिल्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मी अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवला, असं सांगितले आहे. यामुळे माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे तो म्हणाला.

 

‘प्रेमभंगाला काही औषध नसतं, पण त्यावेळी मला खरंच मानसिक शांतीची गरज होती. मी होमिओपॅथिक औषधांचा आधार घेतला. ब्रेकअपनंतर मी अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवू लागलो. माझ्या आयुष्यात जेव्हा मेलानी नावाची गर्लफ्रेंड होती, तेव्हा मी तिच्याशी एकनिष्ठ होतो. मात्र ब्रेकअपनंतर (Breakup) मला काही सुचेनासं झालं. मी बऱ्याच स्त्रियांशी लैंगिक संबंध ठेवलं. खरंतर ते माझ्या प्रामाणिक मनाला अजिबात पटणारं नव्हतं. या गोष्टींचा माझ्यावर खूप खोलवर परिणाम झाला. कधी कधी मी त्याशिवाय राहू शकत नव्हतो तर कधी कधी अक्षरश: मला उलटी यायची”, असा खुलासा विल स्मिथने (Will Smith) स्वतःच्या आत्मचरित्रात केला आहे.

 

 

तसेच तो पुढे म्हणाला “ज्या ज्या महिलेसोबत मी शारीरिक संबंध ठेवले,
त्या प्रत्येकीजवळ गेल्यावर मी हीच एक आशा करायचो की मला माझ्या ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर काढणारी,
माझ्यावर नि:स्वार्थ प्रेम करणारी महिला हिच ठरू दे.
मात्र नेहमी तेच होत गेलं आणि मी आणखी दु:खात बुडत गेलो”.
यानंतर विल स्मिथने 1992 मध्ये शीरी झम्पिनो (Sherry Zampino) हिच्याशी लग्न केले.
या दोघांना एक मुलगा आहे. मात्र 1995 मध्ये ते विभक्त झाले.
यानंतर 1997 मध्ये विलने जेडा पिंकेटने (Villane Jedda Pinket) स्मिथशी लग्न केलं.
या दोघांना जॅडेन ख्रिस्तोफर सायर स्मिथ (Jaden Christopher Sawyer Smith) आणि विलो कॅमिल रेन स्मिथ (Willow Camille Ren Smith) ही दोन मुलं आहेत.

 

Web Title :- Anti Corruption Bureau Thane | Filed a case against a police havaldar ravindra sapkale who demanded a bribe to help in a crime

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा