पश्चिम बंगाल यापुढे ‘बांगला’ होणार ?

कलकत्ता : वृत्तसंस्था

पश्चिम बंगाल विधानसभेत पश्चिम बंगालचं नाव ‘बांगला’ करत नामांतरण करण्याचा ठराव ठेवण्यात आला होता. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सरकारने सर्व भाषांमध्ये हे नामांतरण करण्यात यावं असं ठरावात म्हटलं होतं. हा ठराव मंजूर झाला आहे.

ठराव मंजूर झाला असल्याने तो मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे. मंत्रालयाने ठरावाला मंजुरी दिली तरच पश्चिम बंगालचं ‘बांगला’ असं नामांतरण केलं जाऊ शकतं.
[amazon_link asins=’B01B51Z58O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’12c7ef69-90c5-11e8-ba31-c90aee6d5579′]

यापुर्वी २०१६ मध्ये विधानसभेत पश्चिम बंगालचं नामांतरण करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. पश्चिम बंगालचं नाव बंगालीमध्ये बांगला तसंच हिंदी आणि इंग्लिशमध्ये बंगाल असं करण्याचं ठरलं होत. मात्र त्यावेळी काँग्रेस, भाजपा आणि डाव्यांनी या प्रस्तावाला विरोध केला होता.