चांद्रयान 2 : विक्रम ‘लँडर’शी संपर्क होण्याच्या आशा आता ‘धूसर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चांद्रयान २ च्या माध्यमातून सर्व जगाची नजर भारतावर होती. भारताने केलेल्या कामामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत होते. मात्र महत्वाच्या टप्प्यात ही मोहीम असताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला इस्रोचे वैज्ञानिक हा संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत.

चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याच्या उद्देशाने विक्रम लँडरचे नियोजन करण्यात आले होते. मात्र सॉफ्ट लँडिंगच्या काही क्षण आधीच त्याचा संपर्क तुटल्याने अनेकजण चिंतेत होते. कारण संपर्क प्रस्थापित करण्यासाठी इस्रोकडे आता फक्त एक आठवड्याचा कालावधी राहिलेला आहे.

सॉफ्ट लँडिंगनंतर प्रज्ञान रोव्हर बाहेर पडले असते आणि त्यामुळे अंतराळातील अनेक नव नवीन गोष्टी समजायला मदत झाली असती मात्र त्याआधीच संपर्क तुटल्याने सर्व काही बदलले. संपर्क तुटताच येणाऱ्या चौदा दिवसांमध्ये आम्ही संपर्क पुन्हा प्रस्थापित करू असे इस्रोने सांगितले होते. मात्र अद्याप तरी इस्रोच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही आणि हळूहळू ही आशा धूसर होत चालली आहे.

या मोहिमेदरम्यान सर्व काही गोष्टी मोजून मापून आणि मर्यादेत करण्यात आल्या होत्या. म्हणजेच काही दिवसांनी विक्रमची ऊर्जा संपली तर तो नेहमीसाठी अवकाशात हरवून जाईल आणि त्याच्याशी संपर्क कायमचा तुटेल. सॉफ्ट लँडिंगच्या नंतर विक्रमाचे जास्त नुकसान झाले नव्हते कारण विक्रम हार्ड लँडिंग केल्यानंतर जे फोटो पाठवले होते त्यानुसार ते तुटलेले नसल्याचे स्पष्ट झाले होते.

अमेरिकेच्या नासा संस्थेकडूनही भारताला मदत करण्यासाठी विक्रमशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे विक्रमचा लँडरशी संपर्क करण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. मात्र आता कालावधी थोडाच उरला आहे. त्या आधी जर संपर्क झाला नाही तर त्याच्या आशा हळूहळू कमी होत जातील.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या