टायर टयुबमध्ये गावठी दारूची तस्करी करणार्‍याला अटक

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – टायरच्या टयुबमध्ये गावठी दारूची तस्करी करणार्‍याला नाशिकच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली असुन त्याच्याकडून 1 लाख 45 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री उशिरा करण्यात आली आहे.
संदिप कैलास भदाणे (27, रा. वडनाई, ता.जि. धुळे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदरील गावठी दारू ही धुळे जिल्हयातील प्रिंपी येथील भाईदास उर्फ रायसिंग आहिरेच्या दारू अड्डयावरील असुन ती विक्रीसाठी मालेगावात नेली जात असल्याचे सांगितले आहे. जिल्हयातील महामार्गावर अवैधरित्या होणार्‍या मद्यवाहतुकीस आळा बसवा म्हणुन पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे यांना धुळे जिल्हयातील काही जण मालेगाव शहरात गावठी दारूची अवैधरित्या विक्री करीत असल्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगाव ते दरेगाव शिवारात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक संजय दराडे, अप्पर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक करपे, सहाय्यक निरीक्षक संदिप दुनगहू, सहाय्यक फौजदार सुनिल आहिरे, हवालदार राजु मोरे, वसंत महाले, सुहास छत्रे, राकेश उबाळे, देवा गोविंद, कर्मचारी फिरोज पठाण, रतिलाल वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जाहिरात