Pune News : विंग कमांडर श्रृती चौहान मिस इंडिया स्पर्धेत तृतीय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय हवाई दलात विंग कमांडर म्हणून कार्यरत असलेल्या वाघोली येथील श्रृती उद्यसिंग चौहान यांनी मिस इंडिया स्पर्धा 2020-21 मध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. बूट आणि वर्दी घालून देशाची रक्षा करणारी ब्युटी क्वीन सुध्दा होऊ शकते, हे चौहान यांनी सिध्द करून दाखवले आहे.

परदेशात भारताचे नेतृत्व करणारी ती हवाई दलातील एकमेव महिला ठरली आहे. स्पर्धेत तब्बल दोन हजार स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून चौहान यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. श्रृती चौहान या वाघोली (ता. हवेली) येथील बाईफ रोडवरील साई संस्कृती सोसायटीतील रहिवाशी आहेत. चौहान यांनी मिळवलेल्या यशाबद्दल आई- वडिल, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, समीर भाडळे, महेंद्र भाडळे, सुधीर भाडळे आदीनी अभिनंदन केले आहे.