Winter Session -2022 | कामकाज तहकूब करताच देवेंद्र फडणवीस संतापले, म्हणाले- ‘हे बरोबर नाही’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Winter Session -2022 | हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस वादळी ठरला. विधान परिषदेतमध्ये जोरदार गोंधळ झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे भाषण मध्येच थांबवून उपसभापतींनी (Winter Session -2022) कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब केले. यामुळे देवेंद्र फडणवीस कमालीचे संतापल्याचे पहायला मिळाले.

विधान परिषदेमध्ये आज शिवसेनेचे पक्षप्रमुख (Shiv Sena Party Chief) आणि आमदार उद्धव ठाकरे (MLA Uddhav Thackeray) हे हजर होते. यावेळी त्यांनी राज्यातील उद्योग राज्याबाहेर गेल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उभे राहिले. मात्र, विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. यावेळी विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) निलम गोऱ्हे यांनी गोंधळ पाहता 15 मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले. सभागृहाचे कामकाज तहकूब केल्यामुळे फडणवीस यांनी ‘हे बरोबर नाही’ असं म्हणत आपली नाराजी व्यक्त केली.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. ’50 खोके एकदम ओके’ असे बॅनर घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी सुरु केली. ‘गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी’ असे बॅनर घेऊन घोषणाबाजी केली.

विरोधकांच्या घोषणाबाजीनंतर शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार भरत गोगावले
(MLA Bharat Gogawle), प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर
(BJP Leader Pravin Darekar) घोषणाबाजी करण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहिले.
यावेळी ’50 आमदार एकम ओके, घरी बसले बोके’, असे बॅन घेऊन घोषणाबाजी केली. याच दरम्यान उद्धव ठाकरे हे देखील सभागृहात गेले. त्यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी आपली घोषणाबाजी सुरु ठेवली होती.

Web Title :- Winter Session -2022 | winter session this is not right devendra fadnavis was furious as the work was adjourned

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Thane ACB Trap | 3 हजाराची लाच घेताना पोलीस अ‍ॅन्टी कप्शनच्या जाळ्यात, पोलीस ठाण्यातच स्विकारली लाच

Winter Foods | हिवाळ्यात शरीर आतून ठेवायचे असेल गरम? रोज खा हे 3 फूड्स, थंडीपासून होईल रक्षण

Ajit Pawar | अधिवेशनात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी