…अन् आंध्रप्रदेशसाठी संसदेत अवतरले ‘छत्रपती शिवाजी महाराज’

नवी दिल्ली: वृत्तसंस्था – संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारी तिहेरी तलाक विधेयक ठेवण्यात आले होते. त्याला बहुमत मिळाले. आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला एक आठवडा झाला. दरम्यान राफेलसह अनेक मुद्दे संसदेच्या पटलावर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा याकरिता तेलुगू देशम पक्षाचे (टीडीपी) नेते नेहमीच आग्रही राहिले आहेत. आज याच मागणीकरिता टीडीपी चे नेते नारामल्ली शिवप्रसाद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करीत संसद परिसरात आंदोलन केले.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनापासूनच आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी टीडीपी नेते आंदोलन करत आहेत. यावेळी हिवाळी अधिवेशनामध्येही त्यांनी हा मुद्दा लावून धरला आहे. पावसाळी अधिवेशनामध्येही शिवप्रसाद यांनी विविध वेशभूषा करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा या प्रकारच्या आंदोलनाची कास धरली आहे.
सोमवारी लोकसभेमध्ये तिहेरी तलाक विधेयक ठेवण्यात आले होता. त्याला बहुमत मिळाले आहे. यामुळे तिहेरी तलाक देणाऱ्या आरोपीवर फौजदारी खटला चालणार आहे. तर, आज अधिवेशनाच्या सातव्या दिवशी महत्त्वाचे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. तसेच राफेल प्रकरणावरुन भाजप नेते संजय जयस्वाल यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात लोकसभेमध्ये विशेषाधिकार प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे या प्रकरणावर संसदेचे वातावरण तापण्याची शक्यता आहे.