Winter Tips | थंडीत गरम पाण्याने आंघोळ केल्याने होते नुकसान, ‘या’ 10 चूका करणे टाळा; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Winter Tips | हिवाळ्यात सर्दी, फ्लू आणि इन्फेक्शन पसरण्याचा धोका खुप वाढतो. या हवामानात थंडीपासून वाचण्यासाठी लोक गरम कपडे, गरम पाणी, चहा-कॉफीसारख्या गोष्टींचा आधार घेतात. परंतु तुम्हाला माहित आहे का थंडीपासून दिलासा मिळवण्याच्या काही पद्धती अडचणी निर्माण करू (Winter Tips ) शकतात. (warm water bath could be dangerous in winter be careful about these 10 mistakes)

 

जसे की उशीरापर्यंत गरम पाण्याने आंघोळ करण्याने सुद्धा शरीराचे नुकसान होते. थंडीत कोणत्या चूका करू नयेत ते जाणून घेवूयात…

 

1. उशीरापर्यंत गरम पाण्याने आंघोळ करणे (Bathing in hot water until late) –
एक्सपर्टनुसार, थंडीच्या हंगामात जास्त वेळपर्यंत गरम पाण्याचा शॉवर घेणे आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे आपली शरीर आणि मेंदूवर वाईट परिणाम होतो. कारण गरम पाणी केराटिन नावाच्या त्वचेच्या पेशी डॅमेज करते. ज्यामुळे त्वचेत खाज, ड्रायनेस आणि रॅशेसची समस्या वाढते.

 

2. खुप जास्त कपडे (Too much clothing) –
थंडीच्या हंगामात स्वताला गरम ठेवणे चांगले आहे, परंतु जास्त कपडे घालणे टाळले पाहिजे. असे केल्याने शरीर ओव्हरहीटिंगला बळी पडते. कारण थंडी लागल्याने आपली इम्यून सिस्टम व्हाईट सेल्स (WBC) निर्माण करते, ज्या इन्फेक्शन आणि आजारापासून वाचवतात. तर शरीर ओव्हरहीट झाल्याने इम्यून आपले काम करत नाही.

 

3. जास्त खाणे (Overeating)-
थंडीत आहार अचानक वाढतो. या काळात कॅलरी जास्त खर्च होते, ज्याची भरपाई आपण हॉट चॉकलेट किंवा एक्स्ट्रा कॅलरीच्या फूडने करू लागतो. अशावेळी भूक लागल्यावर केवळ फायबरयुक्त भाज्या खा. (Winter Tips)

 

4. कॅफेन (Caffeine) –
थंडीच्या हंगामात चहा आणि कॉफीमुळे शरीर गरम ठेवण्याची युक्ती चांगली आहे. पण खुप जास्त चहा-कॉफी प्यायल्याने कॅफेनमुळे नुकसान होऊ शकते.

 

5. कमी पाणी पिणे (Drink less water) –
थंडीत कमी तहान लागत असल्याने पाणी कमी प्यायले जाते. यामुळे डिहायड्रेशन होऊन अनेक समस्या होऊ शकतात. किडनी, डायजेशनची समस्या होऊ शकते.

 

6. झोपण्यापूर्वी काय करावे (What to do before bed) –
एका संशोधनानुसार, रात्री झोपण्यापूर्वी हात आणि पाय ग्लव्हजने कव्हर करा.

7. बेडटाइम रूटीन (Bedtime routine) –
या काळात दिवस छोटा आणि रात्री मोठी असल्याने सर्काडियन सायकल डिस्टर्ब होते, तसेच शरीरात मेटालेनिन हार्मोनचे (झोपेचे हार्मोन) प्रोडक्शन वाढते. यामुळे झोप येते, सुस्ती येते. यासाठी स्लीपिंग टाइममध्ये चांगली झोप घ्या.

 

8. बाहेर जाणे टाळणे (Avoid going out) –
थंडीमुळे अनेक लोक बाहेर जात नाहीत. यामुळे आरोग्यावर जास्त परिणाम होतो. फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी खराब होते. लठ्ठपणा वाढतो. सूर्यापासून मिळणारे व्हिटॅमिन डी सुद्धा मिळत नाही.

 

9. एक्सरसाईज (Exercise) –
थंडीत तापमान कमी असल्याने लोक बिछान्यात पडून राहतात. यामुळे फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी शून्य झाल्याने इम्यून सिस्टम सुस्त पडते. यासाठी सायकलिंग, वॉकिंग किंवा कोणतेही वर्कआऊट करा. (Winter Tips)

 

10. सेल्फ मेडिकेशन (Self medication) –
या काळत्तत लोकांना नेहमी खोकला, ताप, सर्दीची समस्या होते.
अशावेळी डॉक्टरांकडे न जाता सेल्फ मेडिकेशन करणे जीवघेणे ठरू शकते.
ही गंभीर आजाराची लक्षणे सुद्धा असू शकतात. (Winter Tips)

 

Web Title :- Winter Tips | warm water bath could be dangerous in winter be careful about these 10 mistakes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parambir Singh | जाणून घ्या परमबीर सिंगांचा लेटर बॉम्ब ते अनिल देशमुखांच्या अटकेपर्यंतचा घटनाक्रम

Winter Health Care | हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर आवश्य फॉलो करा ‘या’ 5 टिप्स; जाणून घ्या

Ashish Shelar | ‘परमबीर सिंग गायब होण्यामागे ठाकरे सरकार, ते सापडले तर सरकारचं पितळ उघडं पडेल’; आशिष शेलार यांचा आरोप