‘वॉन्टेड’ आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले

फतेहपूर: वृत्तसंस्था
मराठीमध्ये एक महान प्रचलित आहे. काखेत कळसा आणि गावाला वळसा. या म्हणीचा अर्थाला साजेशी घटना फतेहपूर येथे नुकतीच घडली. पोलीस आरोपीला शोधण्यासाठी अख्खे गाव शोधात होते चौका-चौकात घरांवर पोस्टर लावत होते. या गडबडीत थेट आरोपीच्याच घरावर पोस्टर लावताना तो शेजारी उभा असून ओळखू शकले नाहीत.
पोलीस भीम आर्मीचा राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतनच्या फतेहपूरमधील घरी पोहचले. घरी गेल्यावर पोलिसांनी विनय रतनच्या आईशी त्यांनी संवाद साधला. विनय रतनच्या भावाशी देखील बोलले. विनय रतन फरार आहे त्यामुळे आम्ही त्याचे वॉन्टेडचे पोस्टर लावतो आहोत असे पोलिसांनी सांगितले. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे विनय रतन पोस्टर लावताना पोलिसांच्या शेजारी उभा होता आणि तरीही पोलीस त्याच्या वॉन्टेडचे पोस्टर लावत बसले.

हे पोस्टर लावून पोलीस निघून गेले, त्यानंतर काही तासांनी परत आले. तेव्हा विनय रतन तिथून पळाला होता. पोलिसांनी त्याच्याशीही गप्पा मारल्या. मात्र हाच रतन आहे हे पोलिसांनी ओळखले नाही असे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे. मात्र या सर्व प्रकरणामुळे पोस्टर लावणारे पोलीस अडचणीत आले आहेत. या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे सहराणपूर पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे.

विनय रतन हा जातीयवादी हिंसाचार भडकवण्यासाठी वॉन्टेड आहे. तो मे २०१७ पासून फरार आहे. पोलिसांनी विनय रतनवर १२ हजारांचे बक्षीसही ठेवले आहे. तीन हवालदार आणि दोन पोलीस सब इन्स्पेक्टर पोस्टर लावण्यासाठी गेले होते. ते पोलीस विनय रतनला ओळखू शकले नाहीत. स्थानिक प्रसारमाध्यमे आणि पोलीस यांनी हा विनय रतनच असल्याचे सांगितले. हे समजल्यावर काही तासांनी पोलीस पुन्हा त्याच्या घरी गेले आणि तोवर विनय तिथून फरार झाला होता.