‘पती जबरदस्तीनं CAA विरूध्द आंदोलन करण्यास पाठवतो’, पत्नीनं केली ‘पोलखोल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अलिगढमध्ये एका महिलेने आरोप केला आहे की तिचा पती तिला जबरदस्तीने सीएएच्या विरोधात निदर्शनात सहभागी होण्यासाठी पाठवतो. या प्रकरणी अलिगढमधील पोलिस लोकांना समज देत आहेत की त्यांनी विनाकारण सीएएच्या निषेधात सहभागी होऊ नये. यावेळी, जेव्हा पोलिस अलिगढमधील एका घरात पोहोचले तेव्हा महिला तिच्या पतीवर संतापली. महिलेने सांगितले की, आठवड्याभरापासून पती तिला सीएएविरोधात सुरू असलेल्या निषेधार्थ भाग घेण्यासाठी सक्तीने पाठवत असत. महिलेने सांगितले की, मी खोटे बोलत नाही. दररोज माझा जीव खातात, ते म्हणतात की ते तिथे आंदोलन सुरु आहे … जा तू … आठवड्याभरापासून त्यांनी माझा जीव खाल्ला आहे. ” मात्र, महिलेच्या पतीने हे आरोप फेटाळून लावत पत्नी खोटे बोलत असल्याचे म्हणत आहे. पोलिसांनी महिलेच्या पतीला पत्नीवर दबाव आणू नका असे सांगितले.

दरम्यान, प्रशासनाने सीएए आणि एनआरसीविरोधात अलीगढमधील जीवनगढ बायपासजवळ सुरु असलेले आंदोलन दोन दिवसांपूर्वीच हटविले. सिव्हिल लाईन्स आणि क्वार्सी पोलिस स्टेशन परिसरातील काही लोक महिला पुरुषांना अनुप शहर चुंगी येथे निदर्शने करण्यास प्रोत्साहित करीत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली.

घराघरात पोहोचले सिटी मॅजिस्ट्रेट आणि सीओ

याबाबत पोलिस प्रशासनाने नवीन उपक्रम सुरू केला आहे. सोमवारी सिटी मॅजिस्ट्रेट रंजित सिंह आणि सीओ अनिल समानिया यांच्या नेतृत्वात पोलिस आणि प्रशासनाच्या पथकाने क्वार्सी पोलिस स्टेशन परिसर आणि सिव्हील लाईन पोलीस स्टेशन परिसरातील भागात जाऊन महिला पुरुषांना आंदोलन करू नये असे आवाहन केले. लोकांना न्याय देण्यासाठी सिटी मॅजिस्ट्रेट स्वत: लोकांच्या घरोघरी जात आहेत.

पोलिसांनी सांगितले की, कोणी जबरदस्तीने एखाद्यास आंदोलन करण्यास पाठवले तर त्याला नोटीस दिली जाईल. अलिगडचे अपर शहर दंडाधिकारी रंजित सिंह म्हणाले की, चुंगी गेट येथे जे लोक आंदोलन करत आहेत, त्यातील अनेक महिलांना काही लोक भडकवत असल्याची माहिती मिळाली आहे. रंजित सिंह म्हणाले की, त्यांनी सर्व लोकांना समजावून सांगितले कि, अनावश्यकपणे शांततेत अडथळा आणू नका. शांततेत अडथळा आणणाऱ्यांना नोटीस देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.