पतीनं होळीसाठी कपडे घेतले नाहीत, पत्नीनं 6 महिन्याच्या मुलीला संपवलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे नवरा बायकोच्या शुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणात पत्नीने 6 महिन्याच्या निरागस मुलीचा जीव घेतला. ही घटना अलीगड जिल्ह्यातील रामपूर गावची आहे.

25 वर्षीत महिलेने आपल्या पतीकडे होळीसाठी कपडे घेऊन देण्याची मागणी केली होती, जी पतीने नाकारली, त्यामुळे नवरा बायकोमध्ये वाद झाला. वादाने पत्नी भडकली. या रागाच्या भरात तिने आपल्या 6 महिन्याच्या मुलीला बेदम मारहाण केली ज्यात निरागस मुलीचा मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले की आरोपी पत्नीचे नाव पिंकी शर्मा आहे. पिंकीच्या पतीने राहुलने पत्नीला नवे कपडे खरेदी करण्यासाठी बाजारात जाण्यास नकार दिला. ज्यावर दोघात वाद झाला. भांडणादरम्यान आरोपी पिंकीने आपल्या 6 महिन्याच्या मुलीला सोनीला बेदम मारहाण केली, लहानग्या मुलीला ही मारहाण सहन न झाल्याने तिने दम सोडला.

या घटनेनंतर पती राहुलने आपल्या पत्नीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पिंकीच्या विरोधात आयपीसी कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि तिला अटक केली आहे. पिंकीने पोलिसांना सांगितले की तिने तिच्या मुलीला मुद्दाम मारले नाही.

तिने सांगितले की ती घरगुती कारणाने आणि आपल्या पतीमुळे निराश होती. भांडणानंतर तिचे स्वत:वरील नियंत्रण सुटले, त्यामुळे तिने कोणताही विचार न करता मुलीला रागाच्या भरात मारहाण करण्यास सुरुवात केली.

माहितीनुसार, पिंकीचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला होता, तिचा पती राहुल एका कुलूप तयार करणाऱ्या कंपनीत कामाला होता. त्यांना तीन वर्षांचा मुलगा देखील आहे.