अनुराधा पौडवाल यांच्यावर 50 कोटींची ‘केस’, या महिलेनं केला मुलगी असल्याचा ‘दावा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळच्या तिरुअनंतपुरम शहरातील एका महिलेने बॉलिवूडची दिग्गज पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांची मुलगी असल्याचा दावा केला आहे. या महिलेचे नाव करमाला असून या महिलेने जिल्हा कुटुंब न्यायालयात खटला दाखल केला आहे. याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. १९७४ मध्ये जन्माला आलेल्या करमालाने असा दावा केला आहे की, अनुराधाने तिला तिच्या सध्याच्या पालकांच्या स्वाधीन केले होते. जेव्हा ती फक्त ४ दिवसांची होती.

महिलेचे म्हणणे आहे की, अनुराधाचे बिजी सिंगिंग शेड्यूल आणि करिअरमधील यशामुळे अनुराधा करमालाचे पालनपोषण करू शकत नव्हती. म्हणून अनुराधाने असे केले.

पद्मश्री आणि राष्ट्रीय फिल्म पुरस्कार विजेती अनुराधा पौडवाल यांचे अरुण पौडवाल यांच्याशी लग्न झाले होते. १९५२ मध्ये जन्मलेल्या अनुराधा आता ६७ वर्षाच्या आहेत.

फिल्मी आहे करमाला ची कहाणी –
करमाला ने एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, “माझे वडील पोंचन यांनी ४-५ वर्षांपूर्वी निधन होण्याआधी मला माझ्या वास्तविक आईविषयी सांगितले जी की प्रत्यक्षात अनुराधा पौडवाल आहे. मला सांगितले गेले की मी फक्त ४ वर्षांची होते, जेव्हा माझ्या आईने मला माझ्या सध्याच्या पालकांच्या स्वाधीन केले.”

करमाला चे म्हणणे आहे की, तिचे वडील सैन्यात होते आणि ते अनुराधा चे चांगले मित्र होते. त्या काळात त्यांची पोस्टिंग महाराष्ट्रात होती आणि नंतर त्यांची बदली केरळमध्ये झाली.

मिळालेल्या माहितीनुसार करमाला च्या सध्याच्या आईला देखील हे माहित नव्हते की ती अनुराधा ची मुलगी आहे.या जोडप्यास एकूण तीन मुले आहेत आणि त्यांनी करमाला ला चौथी मुलगी म्हणून वाढविले. करमालाची सध्याची आई सुमारे ८२ वर्षांची असून अल्झायमर आजाराने ग्रासलेल्या अवस्थेत आहे.

करमाला चे म्हणणे आहे की, वडिलांकडून असा खुलासा मिळाल्यानंतर अनुराधा सोबत खूप वेळेस फोनवर बोलण्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्या फोनवर नीट प्रतिसाद दिला नाही.

करमाला ने सांगितले की खूप वेळेस फोन केल्याने त्यांनी नंबर ब्लॉक केला. त्यांनी सांगितले, “आता मी कायदेशीररित्या सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. ती माझी आई आहे आणि ती मला परत हवी आहे.” करमालाच्या वकिलाने सांगितले की, कोर्टाने अनुराधा आणि तिच्या मुलांना २७ जानेवारीला समन्स बजावले आहेत. आणि त्याच दिवशी सुनावणी केली जाणार आहे.

करमाला च्या वकिलांनी सांगितले की त्यांच्या मुलांसोबत देखील संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांनी कधीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.

करमाला ने अनुराधा पौडवाल यांना ५० कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे आणि असे ही सांगितले आहे की अनुराधा आणि तिचा नवरा तिला स्वीकारण्यास नकार देत असतील तर डीएनए चाचणी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/