पाळणा चोरण्याच्या ‘गणगनी’त ‘तिनं’ बाळाला मॉलमध्येच सोडलं, पुढे झालं ‘असं’ काही (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये एक महिला स्ट्रॉलर (पाळणा) चोरण्यासाठी मॉलमध्ये शिरली. तिने पाळणा चोरला देखील, परंतु या गडबडीत स्टोअरमध्ये चुकून ती तिच्या मुलाला विसरुण निघून गेली. नंतर, जेव्हा मुलगा विसरल्याने तिच्या लक्षात आले तेव्हा ती पुन्हा त्या दुकानात पोहोचली आणि तिची चोरी पकडली गेली. महिलेची चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून स्टोअरच्या मालकाने आता चोरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि निरपराध मुलासह असे कधीही करु नये असे आवाहन केले आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, न्यू जर्सीच्या मिडलटाउनमध्ये बांबी बेबी स्टोअरमध्ये तीन महिला प्रवेश करतात. यापैकी दोन महिला स्टोअरमध्ये उपस्थित असलेल्या कर्मचार्‍याचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न करतात. त्याचवेळी तिसरी महिला तेथे ठेवलेल्या स्ट्रोलरची चोरी करते आणि निघून जाते. थोड्याच वेळात दोन्ही बायकाही तिथून निघून गेल्या. महिला गेल्यानंतर स्टोअरच्या मालकास समजते की, एक मूल कोणीतरी स्टोअरमध्येच विसरून गेले आहे. मुलाच्या पालकांविषयी माहिती मिळविण्यासाठी जेव्हा तो सीसीटीव्ही फुटेज शोधतो तेव्हा त्याला स्टोअरमधील चोरीबद्दल माहिती मिळते.

चोरीनंतर थोड्याच वेळात त्या महिलेच्या लक्षात आले की, ती मुलाला स्टोअरमध्येच विसरून गेली आहे. महिला मुलाला घेण्यासाठी स्टोअरमध्ये पोचते, परंतु तोपर्यंत स्टोअरच्या मालकास चोरी झाल्याची माहिती होते आणि ती महिला पकडली जाते. बांबी बेबीने चोरीचा हा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला आहे.

स्टोअरचा मालक एनेलियो ओर्टेगा याने सांगितले, जेव्हा मला कळले की स्टोअरमध्ये कोणीतरी आपल्या मुलाला विसरले आहे तेव्हा मी फार घाबरलो. चोरी करणे फार महत्वाचे असेल तर ती त्या व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे. परंतु जेव्हा आपण मुलाला अशा कामावर आणता तेव्हा मुलाला काय होत आहे. हे देखील माहित नसते. हा व्हिडिओ पाहून मला मानसिक त्रास होतो वाईट वाटते.

आरोग्यविषयक वृत्त –