Video कॉलिंगच्या माध्यमातून महिलेने कपडे काढले अन्..

नांदुरा : पोलीसनामा ऑनलाइन –  नांदुरा येथील एका अनोळखी महिलेने व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून एका ३४ वर्षीय तरुणाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर त्या महिलेने त्या तरुणासोबत व्हिडिओ कॉलवर अश्लील संभाषण आणि अश्लील कृत्य करून धमकी दिली आहे. धमकी देत त्या महिलेने पैशाची मागणी केली आहे. तर त्या महिलेविरुद्ध त्या तरुणाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अधिक माहितीनुसार, येथील शहरातील एका सुशिक्षीत कुटुंबामधील ३४ वर्षीय व्यक्तीस ७ एप्रिलला सकाळी ११ वाजता मोबाईक नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल आला. तर त्या व्यक्तीने तो काॅल उचलला. यानंतर त्या अनोळखी महिलेने काही सवांद झाल्यानंतर ‘तुम्हारे सिवा मेरा ईस दुनियामें कौन?, असे म्हणत असताना त्यावेळी स्वतःचे कपडे काढले. गैरप्रकार दिसुन येताच त्या तरुणाने तात्काळ आपला फोन बंद केला.

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर लगेच त्यावरील मोबाईल नंबरवरून एका पुरूषाने कॉल करून तुमचा व्हिडीओ तयार केला आहे, आणि ५ हजार रुपये पाठविण्याचे सांगितले. पैसे नाही दिले तर तुमचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हॉयरल करण्याची धमकी दिली. यानंतर पुन्हा २ ते ३ वेळा कॉल करून, शिवि देऊनही धमकी दिली गेली. तसेच, सुरूवातीला भिलेल्या त्या तरुणाने मित्रांसमवेत पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणावरून पोलिसांनी त्या तरुणाची समजून काढून रितसर तक्रार नोंद करून घेतली. आणि आर्थिक फसवणुकीपासुन वाचविले. तसेच तरुणाचे मनोधैर्य वाढविले. मात्र नेमका प्रकार काय आहे याचा तपास नांदुरा पोलीस करत आहेत.