Jalna News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून राहत्या घरात छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. जळगाव सपकाळ (ता. भोकरदन ) येथे रविवारी (दि. 14) ही घटना घडली. याप्रकरणी पती, सासू, सास-यासह तिघांना अटक केली आहे.

मोनिका शिवाजी गाडेकर (वय 26, रा. जळगाव सपकाळ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी विवाहितेची आई शिला प्रभाकर मोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती, शिवाजी गाडेकर, सासरे भालचंद्र गाडेकर, सासू बेबीताई गाडेकर यांना अटक केली आहे.

पारध पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका गाडेकर यांचे 2017 मध्ये शिवाजी गाडेकर यांच्याशी थाटामाटात विवाह संपन्न झाला होता. विवाह झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस सासरच्या मंडळीनी विवाहितेला चांगली वागणूक दिली. मात्र त्यानंतर पती, सासू, सासरे आदीनी लक्झरी बस घेण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये घेऊन ये, म्हणून तगादा लावला आणि तिचा शारीरिक व मानसिळ छळ केला. सततच्या छळाला कंटाळून मोनिकाने राहत्या घरात छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.