महिलांनी आरोग्याकडे अधिक लक्ष द्यायला हवं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एकाच वेळी अनेक आघाड्यांवर महिला काम करत असतात. घरातील कामं, मुलांची जाबाबदारी, ऑफिस व अन्य कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांचे आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसतं. खरं तर पुरूषांच्या तुलनेत महिलांकडे सर्वाधिक जबाबदारी असल्याचे आढळून येते. यासाठी महिलांनी आपले आरोग्य प्रथम जपले पाहिजे.

अलिकडे महिलांमध्ये अनेक आजारांचे प्रमाण बळावत चालले आहे. हृदयविकार, ब्रेस्ट कॅन्सर, सांधेदुखी, डिप्रेशन अशा अनेक आजारांना महिला बळी पडत आहेत. एकुणच आपल्या अरोग्यासाठी महिलांनी जागरूक राहणे गरजेचं आहे.
महिलांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण जास्त आहे. मासिक पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्ती यामुळे हार्मोन्समध्ये होणार बदल महिलांमधील चिडचिड आणि डिप्रेशनचं प्रमुख कारण आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी अनेक तज्ज्ञ आणि हेल्पलाईनही उपलब्ध आहे. महिलांना सांधेदुखी जास्त बळावते कारण महिलांची हाडं लहान आणि कमी जाडीची असतात. हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेलं एस्टड्ढोजन हार्मोन्स महिलांची रजोनिवृत्ती जवळ आल्यास कमी होतो. लहान शरीर रचना, सकस आहार न घेणे, मद्यपान आणि धूम्रपान, औषधांवर अवलंबून असणे इत्यादी गोष्टी यासाठी कारणीभूत असतात. आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करणे, पुरेशा व्यायामासह चांगला आहार घेणं गरजेचं आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमयुक्त आहार घेतल्यास सांधेदुखीला प्रतिबंध करता येऊ शकतो.

अनेक महिला ब्रेस्ट कॅन्सरनं ग्रस्त असल्याचे दिसून येत आहे. महिलांनी नियमित तपासणी केल्यास कॅन्सरचं निदान लवकर होईल आणि परिणामकारक उपचार करता येतील. वय, कुटुंबात कुणाला कॅन्सर असल्यास, रजोनिवृत्ती, कमी वयात मासिक पाळी येणे इ. ब्रेस्ट कॅन्सर होण्यास कारणीभूत आहेत. हृदयाचे आजार बळावण्याचं प्रमाण सध्या दहापटीनं वाढलेलं आहे. विशेषत महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. हृदयाच्या आजारामुळे सर्वाधिक पुरुषांचा मृत्यू होत असला तरी अनेक महिलांममध्ये कित्येक वर्ष या आजाराचं निदान होत नाही. उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलची जास्त पातळी, धूम्रपान या गोष्टी हृदयाचे आजार बळावण्यास कारणीभूत ठरतात. यासोबत रजोनिवृत्ती आल्यास धोका वाढतो. हृदयाचे आजार टाळण्याचा योग्य मार्ग म्हणजे जीवनशैलीत बदल करणमे, नियमित व्यायाम करणे, सकस आहार घेणे आणि वजन नियंत्रित ठेवणे.