दुर्मिळ शस्त्रक्रिया ! पुण्यात महिलेच्या पोटातून तब्बल १२ किलोचा ‘मांसगोळा’ काढला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये एका महिलेच्या पोटाची दुर्मीळ शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेत या महिलेच्या पोटातून चक्क १२ किलोचा मांसाचा गोळा डॉक्टरांनी बाहेर काढला आहे. पुण्यातील या रुग्णालयात प्रथमच मोठ्या प्रमाणावरील शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी दुर्बिणीतून करण्यात आली आहे. शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या महिलेचे नाव पल्लवी गंगावणे आहे.

पल्लीवी गंगावणे या मूळच्या बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांना पोटात सतत दुखत होते. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांना ११ जुलैला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एक्स-रे, रक्त-लघवी यांची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यांच्या स्त्रीबीजाला बीनायन ओवॅरिअन ट्यूमर म्हणजे आतड्याला होणारा आजार असल्याचे स्पष्ट झाले.

पल्लवी यांनी अनेक वर्षांपासून पोटाचा त्रास होत होता. त्यांना वारंवार खासगी रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांना गर्भधारणा राहत नव्हती. खासगी रुग्णालयात उपचारासाठी या शस्त्रक्रियेकरिता दीड ते दोन लाख रुपये खर्च सांगण्यात आला होता. तेवढे त्यांच्याकडे नव्हते. म्हणून त्यांनी वायसीएम रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. जेथे दीड दोन लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला ते फक्त दोन टाके करून करण्यात आले.

दरम्यान, ही शस्त्रक्रिया डॉ. संजय पाडळे, डॉ. नितीन देशपांडे, डॉ. कांचन वायकुळे, मारुती गायकवाड, ज्ञानेश पाटील, डॉ. जितेंद्र वाघमारे, सुजाता ताथे, स्मीता शेटे, डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. तब्बल अडीच तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता महिलेला गर्भधाराणा होणे सोपे होणार आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदी वातावरण आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे