पुण्यात सनबर्न फेस्टिव्हल होऊच देणार नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातल्या बावधन येथे २९ ते ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलला पुणे शहर दहीहंडी आणि गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने आक्षेप घेण्यात आला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात डॉल्बीबंदचा कायदा करण्यात आला होता. मंडळातील कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. त्याच धर्तीवर सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांवर गुन्हे का दाखल होत नाहीत, असा सवाल देखील समन्वय समितीने पुण्यातील पत्रकार परिषदेदरम्यान उपस्थित करण्यात आला.

नक्की काय आहे दहीहंडी आणि गणेशोत्सव समन्वय समितीचे म्हणणे

–पुणे शहरात दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करण्यात पण शासनाने ध्वनिप्रक्षेपकांनवर निर्बध घालून दिले. मंडळातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याच धर्तीवर सनबर्न फेस्टिवलच्या आयोजकांवर गुन्हे का दाखल होत नाहीत.

–पुण्यातील गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध असून देखील मंडळांचे देखावे रात्री १० वाजता बंद करण्यात आले. पण सनबर्न फेस्टिव्हल मध्ये मात्र वेळेची मर्यादा पाळण्यात येत नाही.

–दहीहांडी आणि गणेशोत्सव प्रमाणे सनबर्न फेस्टिव्हलमध्ये चार स्पीकर लावण्याची मर्यादा पाळली जात नाही.

–ATS आधिकारीनच्या माहितीनुसार काही संघटना सनबर्न फेस्टिव्हलमध्ये घातपात करण्याचा कट रचत आहेत अशा परिस्थितीत परवानगी देणे योग्य नाही.

–भारतीय सणांवर निर्बंध घातले जातात मात्र सनबर्नसारख्या फेस्टिव्हल र कोणत्याही प्रकारचे अटी आणि निर्बंध घालण्यात येत नाहीत.

–या फेस्टिव्हलमध्ये अनधिकृत मद्य आणि अंमली पदार्थाची विक्री केली जाते. तरी पुणे शहर हे सांस्कृतिक राजधानी असून शहरात या कार्यक्रमाला परवानगी देणे योग्य नाही.

या सर्व कारणांमुळे पुणे शहर दही हंडी आणि गणेशोत्सव समन्वय समितीने या सनबर्न फेस्टिव्हलला तीव्र विरोध दर्शवला आहे. या कार्यक्रमाला परवानगी मिळाली तर समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समिती कडून देण्यात आला आहे.