अश्रुधुर साधने हाताळणे बाबत कार्यशाळा

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुक व होळी,  धुलीवंदन सणा निमित्त गावात तंटा निर्माण होऊन प्रसंगी दोन्ही जमावर नियंञण करण्यासाठी व जमावाला पांगविण्यासाठी पोलीसांना याकामी अश्रुधुराचा वापर करावा लागतो. परंतु हि साधने तातडीने कशी हाताळावी या बाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कारण बऱ्याचदा हि साधने हाताळताना कर्मचारी यांचे कडुन कोणती हि चुक होता कामा नये, व कर्मचारी यांनी ती योग्य पध्दतीने हाताळावी. काही कर्मचारी यांना साधन कसे वापरायचे हे माहिती नाही, घाई गडबडीत वेगळी घटना होवु नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे यांचे आदेशाने मंगळवारी सकाळी तालुका पोलीस स्टेशन मध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

अश्रुधूर साधने बाबत अधिकारी कर्मचारी यांनी कशी हाताळावी या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. कर्मचारी यांनी विचारलेल्या शंकाचे निरसन यावेळी करण्यात आले.  प्रशिक्षक रमेश बारसे डीआय प्रशिक्षक धनेश कुंकुरी यांनी हि माहिती दिली. यावेळी तालुका पोलीस स्टेशन मध्ये अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.